घरमहाराष्ट्रराहुल गांधींवरील कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर...

राहुल गांधींवरील कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर…

Subscribe

राहुल गांधींवरील कारवाईला विरोध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळात विरोधकांनी सभात्याग केला. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळात विरोधकांनी सभात्याग केला. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “एखाद्या नेत्याची खासदारकी रद्द करण्याची ही दुसरी घटना आहे. लोकसभेचा हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.” असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. लोकसभेच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळात विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केलीय.

- Advertisement -

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची अशाच पद्धतीने खासदारकी रद्द केली गेली. मत-मतांतर आणि वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचा प्रकार आतापर्यंत कधी घडला नाही. लोकसभेचा हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे. जनता हे सारं काही पाहतेय, राज्यकर्ते असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची ही परंपरा आहे. पण या परंपरेला तिलांजली देण्यात आली आहे.हा निर्णय जनतेच्या मनाला न पटणारा आहे.” अशा शब्दात अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.

तसंच इंदिराजींच्या बाबतीतही असंच घडलं होतं. त्या वेळचं सरकार थोडं वेगळ्या पद्धतीने वागलं, ज्या इंदिरा गांधींना १९७७ साली आणीबाणीच्या निमित्ताने पराभूत केलं होतं, त्याच इंदिरा गांधींना १९८० साली पुन्हा सत्तेत बसवण्याचं काम लोकशाहीनं केलं. त्यामुळे हे जनतेच्या मनाला न पटणारं आहे, असं देखील अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -