पेट्रोल भरताना मोदी म्हणतात कशी तुझी जिरवली, पेट्रोल पंपावरील फोटोवरुन अजितदादांचा निशाणा

पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. मग पेट्रोल भरताना तुम्ही मोदींच्या फोटोकडे बघायचं

Ajit Pawar targets Modi from photo at petrol pump
पेट्रोल भरताना मोदी म्हणतात कशी तुझी जिरवली, पेट्रोल पंपावरील फोटोवरुन अजितदादांचा निशाणा

देशात पेट्रोल-डिझेलचे भाव १०० रुपयांच्या पार गेले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारवर खोचक टीका करण्यात येत असते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोलच्या दरावरुन मोदींवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स प्रत्येक पेट्रोल पंपावर पाहायला मिळतात. यावरुन अजित पवारांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे. पेट्रोल पंपावर असलेला मोदींचा फोटो पाहिल्यावर ते म्हणत असतील कशी तुझी जिरवली आता भर १०० रुपयांचे पेट्रोल अशी मिश्किल टीप्पणी अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान अजित पवारांनी मोदींच्या बॅनर्सवरुन भाजपला टोलाच लगावला आहे. कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी मोदींचा फोटो असतो यावरुन अजित पवारांनी टोला लगावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे की, देशात आम्ही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून आतापर्यंत अनेक चागंले काम करणारे पंतप्रधान पाहिले. आता पंतप्रधाना मोदी आहेत. मोदींनी हल्ली देशात कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी आपलाच फोटो लावायचा नवा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने म्हणतो की, पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. मग पेट्रोल भरताना तुम्ही मोदींच्या फोटोकडे बघायचं. मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता १०० रुपयांचे पेट्रोल अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी मोदींवर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यात एका पेट्रोल पंपाच्या उद्घानप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी पेट्रोलवरुन मोदींवर निशाणाच साधला आहे.

सर्वांनी गुन्हे होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम (CMIS) यंत्रणेच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार यांनी हजेरी लावली होती. क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम या यंत्रणेमुळे गुन्ह्यावर नियंत्रण बसण्यास मदत होईल व पोलीस यंत्रणेची तपास करण्याची कार्यक्षमता वाढेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच समाजात अतिशय वाईट घटना घडत असताना सर्वांनी गुन्हे होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक असल्याचे अजित पवारांनी पोलिसांना म्हटलं आहे. जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकानं पोलिसांना सहकार्य करावं. सरकार ‘शक्ती’ नावाचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. सर्वांनाच सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, यादृष्टीनं शासनाचे प्रयत्न आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे. सर्वांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे. जे मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागानं दंडात्मक कारवाई करावी. शाळा लवकरच सुरू होत असल्यानं सर्वांनीच नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे प्रकरणी ४ अधिकारी निलंबित, पालकमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर धडक कारवाई