पंतप्रधानांबद्दल अपशब्द म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, अलाहाबाद हायकोर्टाने सुनावले

MODI

पंतप्रधानांबद्दल अपशब्द किंवा शिवीगाळ करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, असं अलाहाबाद हायकोर्टाने सुनावलं. तसेच वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे अटकेची कारवाई झालेल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार देण्यात आला आहे. न्या. अश्वनीकुमार मिश्रा आणि राजेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने ही टीपणी केली आहे.

मुमताज मन्सुरी नावाच्या व्यक्तीने अलाहाबाद हायकोर्टात आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. हा गुन्हा फेसबूकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं म्हटलं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या लोकांना लागू होत नाही, जे इतर नागरिकांविरोधात शिवीगाळ करतात. विशेषतः महत्वाची व्यक्ती पंतप्रधान किंवा इतर कोणी केंद्रीय मंत्री असतील. तर अशा प्रकरणांमुळे संबंधितांवर कारवाई करावी लागते.

अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक स्टेट्स ठेवल्याबद्दल आरोपीला अटक झाली होती. त्याने पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांना कुत्रा असं संबोधलं होतं. याबद्दल आरोपीवर भदंविमधील विविध कलमांसह कलम ५०४ आणि कलम ६७ आयटीअॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एफआयआरमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळं या परिस्थितीत आरोपीवरील गुन्हा रद्द करणं हे योग्य संदेश ठरणार नाही, असं हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.


हेही वाचा : खेड – भीमाशंकरसह महाराष्ट्रातील २ मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, केंद्रीय परिवहनमंत्र्यांची घोषणा