घरमहाराष्ट्रएसटी बँक अडचणीत येण्यास सदावर्ते यांच्याबरोबरीने सरकारही जबाबदार; श्रीरंग बरगेंचा आरोप

एसटी बँक अडचणीत येण्यास सदावर्ते यांच्याबरोबरीने सरकारही जबाबदार; श्रीरंग बरगेंचा आरोप

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या बँकेत चाललेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी करूनसुद्धा सरकारने लक्ष दिले नाही.

मुंबई: (26 नोव्हेंबर) स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंके या 62 हजार सभासद व 502 शाखा असलेल्या बँकेत नवं संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर आतापर्यंत 466 कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या, सीडी रेशो 95.49 टक्क्यांवर गेला आहे .आता ही बँक सावरायला उशीर लागणार असून एसटी कर्मचाऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या बँकेत चाललेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी करूनसुद्धा सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे बँक अडचणीत यायला सरकारचे सहकार खाते जबाबदार असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे. (Along with Gunaratna Sadavarte the government is also responsible for ST Bank getting into trouble Shrirang Barge s allegation(

या प्रकरणी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त को – ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनने सरकारकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या तरीही,सरकार सदावर्ते यांच्या दबावाला बळी पडले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

30 जून 2023 आधीपर्यंत तसेच नवं संचालक मंडळ बॅंकेवर बसण्याआधी 2 हजार 311 कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत होत्या आता त्यात घट होऊन त्या 1845 कोटींवर आल्या आहेत. आणि त्यामुळे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेचा क्रेडिट-डिपाॅझिट रेशो 95.49 टक्क्यांवर आल्याने अडचणीत वाढ होणार सर्वसाधारण को-आॅपरेटिव्ह बॅंकेचा सीडी रेशो 70 ते 75 टक्क्यांमध्ये पाहायला मिळत असतो, पण या बँकेत तो पुढे गेला आहे.

अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन सक्षम हवे. पण त्या ठिकाणी चुकीचे अधिकारी नेमले आहेत. व्यवस्थापकीय संचालक तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. पण एका अनुभवी व्यक्तीची रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासत नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा फटकासुद्धा बसला आहे.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सदावर्तें यांच्या मर्जीतील असल्याने संचालक मंडळ सदस्यांची निर्णय घेण्यात अडचण होत होती, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सीडी रेशोत अजून वाढ झाल्यास सेव्हींग खात्यातील पैसे काढण्यावर निर्बंध येऊ शकतात. अशी भीतीही बरगे यांनी व्यक्त केली आहे.

30 जून 23 रोजी नवे संचालक मंडळ आल्यावर एकूण कर्जे 1776 कोटी रुपये होती. आता एकूण कर्जे 1761 कोटी रुपये आहेत. व्यवहारीकदृष्टया
कर्जात वाढ व्हायला हवी होती. पण झालेली नाही. हे ही बँकेच्यादृष्टीने चांगले नाही.

एसटी मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे बँकेचे सभासदत्व आपोआप कमी होते. त्यासोबत राजीनामा दिलेले असे 3 हजार सभासद कमी झाले असून हीसुद्धा बँकेच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा: फडणवीस म्हणतात, आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वी सोडवला जाण्याची अपेक्षा )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -