घरमहाराष्ट्रओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक

ओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक

Subscribe

मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने हिंगोलीकडे रवाना झाले. त्यादरम्यान त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

हिंगोली: मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने हिंगोलीकडे रवाना झाले. त्यादरम्यान त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. (Attempt to intercept convoy of Chhagan Bhujabal s going to OBC meeting Activists showing black flags arrested Maratha reservation )

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती आहे. यासाठी ते नांदेड येथील विमानतळावर पोहोचले आणि त्यांचा ताफा हिंगोलीकडे निघाला. मात्र, याचवेळी मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. तसंच, घोषणाबाजीदेखील केली. मात्र, आधीपासूनच तैनात असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिघांना ताब्यात घेतलं. तसंच, स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

- Advertisement -

भुजबळांच्या फोटोला दुग्धाभिषेक

नांदेडमधील हिमायतनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला हिमायतनगर शहरातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच, यावेळी हमारा नेता कैसा हो, छगन भुजबळ जैसा हो, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा, अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. त्यानंतर हजारो कार्यकर्ते सभेसाठी रवाना झाले आहेत.

ताफा अडवण्यावर ओबोसी नेत्यांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची सभा घेण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही, ओबीसी समाज जशास तसं उत्तर देईल आणि भुजबळांची सभा होईल. मनोज जरांगेंनी आंदोलकांना आवरावं, असं आवाहन त्यांनी केलं.

- Advertisement -

(हेही वाचा: फडणवीस म्हणतात, आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वी सोडवला जाण्याची अपेक्षा )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -