घरताज्या घडामोडी"वैद्यकीय विद्यार्थ्यांनो परीक्षेसाठी तयारीला लागा, परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे नियमानुसार नाही"...

“वैद्यकीय विद्यार्थ्यांनो परीक्षेसाठी तयारीला लागा, परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे नियमानुसार नाही” – अमित देशमुख

Subscribe

कोवीड१९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन

राज्यात करोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाप्रादुर्भावाच्या आणि रुग्णंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शक्य त्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तर काही रद्द केल्या आहेत. परंतु वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक नसल्यामुळे प्रत्यक्षात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला लागण्यासंदर्भात सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेणे किंवा रद्द करण्यास न्यायालयाने परवानगी दिली नसल्याचे या परीक्षा प्रत्यक्षात घेण्यात येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी याची दखल घेऊन परीक्षेस सामोरे जावे असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांच्या एप्रिल- मे महिन्यातील परीक्षा जून किंवा जूलैमध्ये घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला असून तो १ जूनपर्यंत लागू आहे. परंतु २ जून रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्यात येत आहेत.

- Advertisement -

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सध्या कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. राज्यात कोवीड१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू आहे. २ जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोवीड१९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांचे आहे.

- Advertisement -

या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विदयार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केंद्रिय नियामक मंडळालाही ते मान्य नाही शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरित करावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. मागच्या वर्षात कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने परीक्षा यशस्वीरित्या घेतली असून त्या सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपूर्णत: कोविड१९ सुरक्षा कवच पुरविले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी असे आवाहन निवेदनात त्यांनी केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -