घरगणेशोत्सव 2022अमित शाहांचा मुंबई दौरा; लालबागच्या राजासह मंत्र्यांशी संबंधित मंडळातील बाप्पाचे घेणार दर्शन

अमित शाहांचा मुंबई दौरा; लालबागच्या राजासह मंत्र्यांशी संबंधित मंडळातील बाप्पाचे घेणार दर्शन

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी अमित शाह मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी 9 वाजता दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अमित शाहा लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी अमित शाह मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी 9 वाजता दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अमित शाहा लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या आजच्या दौऱ्यासाठी वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत. (amit shah on mumbai visit popular ganesh pandals lalbaugcha raja 2022 cm eknath shinde devendra fadanvis maharashtra)

लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जाणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाला ते भेट देणार आहेत.

- Advertisement -

याशिवाय अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अमित शाह यांचा मुंबई दौरा

- Advertisement -
  • सकाळी 9 वाजता : अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार
  • सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील.
  • सकाळी 10.30 वाजता : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील.
  • सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.
  • सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील
  • दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.
  • दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.
  • दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.
  • दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.
  • संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण

वाहतूक व्यवस्थेत बदल

अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे.

सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे.


हेही वाचा – तेजस ठाकरेंची राजकारणात ग्रॅण्ड एण्ट्री होणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -