घरताज्या घडामोडीअज्ञात व्यक्तीने फोन करुन मंत्रालय उडवण्याची दिली धमकी, बॉम्ब स्कॉडमार्फत तपासणी सुरु

अज्ञात व्यक्तीने फोन करुन मंत्रालय उडवण्याची दिली धमकी, बॉम्ब स्कॉडमार्फत तपासणी सुरु

Subscribe

अज्ञात व्यक्तीसंबंधात माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली होती त्यानुसार संबंधित व्यक्ती नागपुरचा असल्याचे समोर आले

एका अज्ञात व्यक्तीकडून फोनद्वारे मंत्रालय उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या धमकीची दखल घेत मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयात बॉम्बशोधक पथक, श्वान पथक दाखल झाले असून बॉम्बचा शोध सुरु करण्यात आला आहे. फोनद्वारे दिलेल्या धमकीमध्ये मंत्रालय बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मंत्रालयाच्या कंट्रोल रुमला मिळाली होती. मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता बॉम्ब स्कॉड आणि श्वानपथकामार्फत तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीसंबंधात माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली होती त्यानुसार संबंधित व्यक्ती नागपुरचा असल्याचे समोर आले आहे.

मंत्रालयातील कंट्रोल रुमला साधारणता १२ ते १ च्या दरम्यान धमकीचा फोन आला होता. मंत्रालयाच्या कंट्रोल रुमला अज्ञात व्यक्तीकडून फोन करण्यात आला. मंत्रालयात एक वस्तू ठेवण्यात आली असल्याचे या फोनद्वारे सांगण्यात आले. यानंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट जारी करुन बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक मंत्रालयात दाखल झाले. या पथकांकडून अज्ञात वस्तूचा शोध सुरु करण्यात आला आहे.

- Advertisement -

अज्ञात व्यक्तीची माहिती आली समोर

मंत्रालयाची सुरक्षा दुप्पट करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाच्या अवतीभवती आहे. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक मंत्रालयात आणि मंत्रालयाच्या आसपासच्या भागाची पाहणी करत आहेत. संशयित वस्तूचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने कुठून फोन केला होता तसेच या अज्ञात व्यक्तीच्या संबंधात शोध सुरु करण्यात आला यानुसार हा फोन नागपुरातल्या सागर काशिनाथ मंदरे यां व्यक्तीने फोन केल्याच समोर आले आहे. १२ फेब्रुवारी रोजी या व्यक्तीने आत्मदहानाचा इशारा दिला होता आणि मुख्य सचिवांना अटक करण्याची मागणी केली होती. अधिक तपासामध्ये हा तरुण मानसिकरित्या स्वस्थ नसल्याचे समजते आहे. तसेच मंत्रालयातील परिसरात काहीही अक्षेपार्ह असे आढळले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -