घरमहाराष्ट्रहे षडयंत्र आहे, यात तथ्य नाही - डॉ. आनंद तेलतुंबडे

हे षडयंत्र आहे, यात तथ्य नाही – डॉ. आनंद तेलतुंबडे

Subscribe

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आणि नक्षली संबंधांच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी आपल्यासोबत पुणे पोलिसांनी केलेला व्यवहार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. शिवाय, 'हे षडयंत्र असून, यात तथ्य नाही', असे तेलतुंबडे म्हणाले आहेत.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरण आणि नक्षली संबंधांच्या आरोपाखाली अटक होऊन तात्काळ सुटका झाल्यानंतर जेष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी आज मुंबईतील मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कशा प्रकारे आपल्याला अटक करण्यात आली याबद्दल खुलासा केला. तेलतुंबडे म्हणाले की, ‘हे जे प्रकरण पोलिसांनी रचले ते माझ्या भाषेत सांगायचे तर हा प्रकार सर्व भारतीय नागरिकांच्या विरोधात आहे. कुणी तरी कुणाला पत्र लिहीत आणि त्या पत्राच्या आधारावर आरोपी ठरवलं जातं’. त्याचबरोबर ‘हे सर्व षडयंत्र असून यात काहीच तथ्य नाही’, असे डॉ. आनंद तेलतुंबडे म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले तेलतुंबडे?

डॉ. आनंद तेलतुंबडे म्हणाले की, ‘मी एका खेड्यातून आलो. बाबासाहेबांची प्रेरणा माझ्यात होती. त्यामुळे मी शिक्षणात नेहमीच मेरिटवर होतो. नोकरी करून पैसा कमवणे हे माझं उद्देश नव्हतं. लोकांच्या हिताच काम करता येईल अशीच मी नोकरी मिळवली, जेणे करून मला काम करत येईल. लोकांच्या हितासाठी जे करता येईल तसेच मी लिखाण केले. लोकांच्या हितासाठी मी २६ पुस्तके लिहिली. ती सर्व भाषेत लिहिली. भारत पेट्रोलियम मध्ये एक्सक्यूटीव्हच्या पदापर्यत पोहोचलो. खडकपूर आयआयटीने मला त्यांच्या संस्थेशी जॉईन होण्यासाठी आमंत्रण दिले’.

- Advertisement -

‘माझ्या प्रोफाइलचा भारतात एकही माणूस मिळणार नाही’

या वार्तालापाच्या कार्यक्रमात डॉ. आनंद तेलतुंबडे म्हणाले की, ‘माझ्या प्रोफाइलचा भारतात एकही माणूस मिळणार नाही आणि अशा प्रोफाइलला इथले पोलीस सरकार आज आरोपी ठरवतात. दुसऱ्या लोकांना पकडलं त्यांच्यासाठी मी लिहीत होतो, झटत होतो. सत्र न्यायालयाने माझा अटकपूर्व जमीन फेटाळला. अटकेच्या दिवशी मी कोची वरून सकाळी ०१:४५ येत असताना पोलिसांनी मला मुंबई येथे अटक करून पुण्याला घेऊन गेले. त्यात मला जी वागणूक मिळाली ती मला अपेक्षित नव्हती. मला या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. भिमा कोरेगांव येथिल कार्यक्रम हा बी जी सावंत व कोळसे पाटील हे आयोजक असुन माझ नाव फक्त आयोजन समितीत होत. परंतू माझा भिमा कोरेगांव किंवा यल्गार परिषदेशी माझा काहीही संबंध नव्हता. मी गोव्याला जाणार होतो मात्र त्याआधी पोलिसांनी मला त्याआधी मला मुंबईत अटक केली. मी जन्मात कधी कल्पना केली नव्हती मला अशी वागणूक दिली नाही. मला पोलीस कोठडीत कोंडल हे माझ्यासाठी कळण्यासारख नव्हतं. ही गोष्ट समजली पाहिजे की जे माझ्यासोबत घडलं ते कुणासोबतही घडू शकतं. माझा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास आहे’.

‘हे षड्यंत्र आहे’

आनंद तेलतुंबडे म्हणाले की, ‘द अमेरिकन युनिव्हर्स सिटीऑफ कॉमर्सने एक कॉन्फरन्स आयोजित केली होती त्यासाठी मी गेले होतो. पण यांनी असा शोध लावला की माजी पॅरिसमध्ये मीटिंग होती आणि ज्याला माओवाद्यानी फायनान्स केला. हे मला समजण्यापलीकडे होते. हे षड्यंत्र आहे. त्यात तथ्य नाही. काही तरी थोतांड निर्माण करायची अशी त्याची भूमिका आहे. सरकारच्या पॉलिसीबद्दल बोलतात त्याच्या विरोधात हे षडयंत्र रचतात. आपल्या सर्वांनी एकजुटीने विचार करण्याची वेळ आली आहे’.

- Advertisement -

माझ्यासोबत असं घडतय तर सर्वसामान्याचं काय?

आनंद तेलतुंबडे म्हणाले की, ‘भीमा कोरेगांवच्या प्रकरणावर मी टिकात्मक आर्टीकल लिहले होते. त्यामुळे दलित माझ्यावर नाराज होते, अशी मला माहीती मिळाली. टिकात्मक आर्टीकल लिहून सुध्दा मला त्यात गोवण्यात आले. मला अटक करण्यात आलेल्याच्या निषेर्धात अमेरिका आणि जगातील बऱ्याच देशांनी, आयआयटी, एमआयटीच्या विदयार्थांनी निषेध आंदोलन केले. फ्रेंच दूतावासानेसुद्धा या प्रकरणामध्ये निषेध नोंदवला होता. माझ्या बाबतीत षडयंत्र रचण्यात येत आहे. लोकशाही विचार आणि सरकारी धोरणाबद्दल बोलणाऱ्याला माओवादी ठरवण्यात येते. ‘माझ्या सारख्या शिकलेल्या सुप्रसिध्द विचारवंताची भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये ही अवस्था आहे. मग सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होईल?’, असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.


हेही वाचा – आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध; कोर्टाचा निर्वाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -