अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन मिळण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh) आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात (Special CBI Court) डिफॉल्ट जामीन (Default bail) मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh) आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात (Special CBI Court) डिफॉल्ट जामीन (Default bail) मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख शंभर कोटींच्या घोटाळ्याच्या (Hundred crore scams) आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) आहेत. कोठडीतून बाहेर येण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच उद्या त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत देशमुखांना दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Anil Deshmukh default bail plea to be heard in special CBI court tomorrow)

अनिल देशमुखांनी डिफॉल्ट (Default) जामीन मिळावा यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली. मात्र, अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला विरोध करतानाच सीबीआयने या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र हे पूर्ण असल्याचा दावाही सीबीआयने केला आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली

अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या विरोधात सीबीआयने ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलीस दलातील बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनला आहे. त्यानुसार, दरमहा १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सीबीआयने पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. त्यानंतर ईडीने याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल २०२२ मध्ये सीबीआयने अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले.

हेही वाचागृहमंत्र्याला १०० कोटी कोण देतं?, छगन भुजबळांकडून अनिल देशमुखांची पाठराखण

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. शिवाय, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या प्रकरणी नोव्हेंबर २०२१ मध्ये ७२ वर्षीय देशमुखांना ईडीनं अटक केली.

डिफॉल्ट बेल म्हणजे काय आहे?

ज्या प्रकरणात आरोपींवर लावलेल्या गुन्ह्यांशी संबंधित योग्य न्यायालयात सुनावणी होत नाही. तेव्हा ही अटकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत जामीन मागितला जातो. त्या जामिनाला डिफॉल्ट बेल म्हणतात.


हेही वाचा – धक्कादायक! सांगलीतील मिरजेत विष प्राशन करून ९ जणांची सामूहिक आत्महत्या