घरताज्या घडामोडीईडीनंतर CBI केसमध्ये जामीनासाठी देशमुखांची धडपड, हायकोर्टातील याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

ईडीनंतर CBI केसमध्ये जामीनासाठी देशमुखांची धडपड, हायकोर्टातील याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

Subscribe

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाविरोधात सीबीआयने ते जामीनास पात्र नसल्याचा दावा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्यामुळे ते जामीनास पात्र नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी जेलमध्येच गेली आहे. अनिल देशमुख यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आले आहे. ईडीच्या केसमधून दिलासा मिळाला असला तरी सीबीआयच्या केसमुळे त्यांना जेलमध्येच राहावं लागले आहे. ईडीच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळाला आहे. परंतु सीबीआयकडे भक्कम पुरावे असल्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांनी सीबीआयविरोधात हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. यापूर्वी देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता परंतु अर्ज फेटाळल्यामुळे हायकोर्टात धाव घेतली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुट्टीकालीन कोर्टासमोर सादर करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी सीबीआयला ९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. तसेच सुनावणी ११ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने नोंदवलेल्या प्रकरणामध्ये जमीन मिळाला आहे. याचा दाखला देत आपण जामीनासाठी पात्र आहोत असा दावा हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत देशमुखांच्या वकिलांनी केला आहे. हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याच्या मताविरोधात सचिन वाझेचे साक्ष असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

- Advertisement -

सीबीआयचा दावा कोणता?

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाविरोधात सीबीआयने ते जामीनास पात्र नसल्याचा दावा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्यामुळे ते जामीनास पात्र नाहीत. अनिल देशमुख हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर आपल्या संबंधितांचा फायदा घेऊन प्रभाव टाकतील. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि देश सोडून जाऊ शकतात यामुळे जामीन मंजूर करण्यात येऊ नये असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यात कोविड काळात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. तसेच देशमुखांनी १०० कोटी वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे. परंतु यावरसुद्धा देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. ईडी आणि सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. ईडीच्या केसमध्ये देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु सीबीआयच्या केसमध्ये जामीन मिळाला नसल्यामुळे देशमुखांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -