घरमहाराष्ट्रमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांचं निलंबन

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांचं निलंबन

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील मनी लाँड्रिंग आरोप प्रकरणी अटकेत असलेले देशमुख यांचे माजी खासगी सचिव अप्पर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. संजीव पालांडे यांना ईडीने पीएमएलए कायद्याखाली २६ जून रोजी अटक केली होती. मुंबईतील बार मालकांकडून करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची वसुलीची रक्कम अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे करत होते, असा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान, संजीव पालांडे यांचं निलंबन केलं आहे. संजीव पलांडे हे पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील. निलंबनाच्या कालावधीत संजीव पलांडे यांनी खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा धंदा करता येणार नाही. त्यांनी तसं केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. तसंच, ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील, असं आदेशात म्हटलं आहे.

- Advertisement -

पलांडे विरोधात आरोपपत्र दाखल

अनिल देशमुख यांचे सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. अनिल देशमुख यांच्यासह पलांडे आणि शिंदे यांच्या निवासस्थानी छापे घातल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पलांडे आणि शिंदे यांना २६ जून रोजी अटक केली होती. खंडणीचे पैसे स्वीकारण्यात आणि अनिल देशमुख यांच्याकडे ते हस्तांतरित करण्यात या दोघांची महत्त्वाची भूमिका होती, असा आरोप ईडीचा आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -