घरमहाराष्ट्रनागपूरप्रशासनाची दिरंगाई भोवली, महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर?

प्रशासनाची दिरंगाई भोवली, महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर?

Subscribe

नागपूर – आतापर्यंत चार प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. यावरून राज्यातील राजकारणात आकांडतांडव सुरू असतानाच आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्राला हा प्रकल्प गमवावा लागला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नागपूर येथील महाराष्ट्र विमानतळ कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये फ्रेंचची सॅफ्रन ग्रुप (Safran Group) येऊ इच्छित होती. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हासुद्धा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

हेही वाचा – आता उद्योगमंत्री राजीनामा देणार का? टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सवाल

- Advertisement -

मिहान येथे डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानिमित्ताने विमान आणि रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंचची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. पंरतु, प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ११८५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक येणार होती. तसंच, राज्यात ५०० ते ६०० कुशल रोजगार निर्मिती होणार होती.

एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे, त्यांचे घटक बनवण्यासाठी फ्रेंचमधील सॅफ्रन ग्रुप प्रसिद्ध आहे. ही कंपनी भारतात येऊ इच्छित आहे. त्यासाठी कंपनीकडून चाचपणी सुरू असताना त्यांनी नागपूर येथील मिहानचीदेखील तपासणी केली. यासाठी कंपनीने एमएडीसीशी संपर्कही साधला होता. परंतु, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कंपनीला जागेबाबत व्यवहार करण्यास विलंब झाला. त्यामुळे हा प्रकल्प आता हैदराबाद येथे जात आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हिर आंद्रेस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन हैदराबाद येथील प्रकल्पाबाबत माहिती दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकला एअरबस प्रकल्प होण्यासाठी भुजबळांचे थेट टाटांना पत्र

नव्या प्रकल्पात काय होणार?

हैदराबाद येथे प्रस्तावित असलेला एव्हिएशन प्रकल्पात भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्यांच्या इंजिनांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम करणार आहे. भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या लिप १ ए आणि लिप १ बी अशा प्रकारची इंजिने वापरतात. त्याची देखभाल आणि दुरुस्तीचं काम सॅफ्रन कंपनी करणार आहे. यासाठी ११८५ कोटींच्या थेट परदेशी गुंतवणूक भारतात येणार आहे. यासाठी प्रत्यक्ष ५०० ते ६०० कुशल रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

मिहानमध्ये सध्या काय चालतंय?

मिहानमध्ये सध्या टाटा फ्लोअर बिम, रिलायन्स डसॉल्ट फाल्कनचे सुटे भाग बनवले जातात. तसंच, एअर इंडिया आणि इंदमार या दोन कंपन्याचे एमआरओ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाहतात. या चार युनिटशिवाय डिफेन्स एव्हिएशन क्षेत्रातील एकही मोठी कंपनी मिहानमध्ये आलेली नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -