घरताज्या घडामोडीआर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 2 NCB अधिकाऱ्यांचे निलंबन, मुख्य तपास अधिकाऱ्यासह...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 2 NCB अधिकाऱ्यांचे निलंबन, मुख्य तपास अधिकाऱ्यासह गुप्तचर अधिकारी निलंबित

Subscribe

कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्ररकरणात मोठी माहिती समोर आली आहे. एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खानला अटक केली होती. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबी आणि माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले होते. यामुळे या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. या प्रकरणात आता आर्यन खान प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी आणि एनसीबी गुप्तचर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मुख्य तपास अधिकारी विश्व विजय सिंह आणि आशीष रंजन प्रसाद यांना निलंबित केलं आहे. वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालानंतर कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणाची चौकशी एनसीबी दक्षता पथकाकडून सुरु आहे. या पथकाच्या अहवालानंतर आर्यन खान प्रकरणात तपास करणारे मुख्य तपास अधिकारी विश्व विजय सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशीष रंजन प्रसाद यांनी भूमिका संशयित आढळली आङे. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तपासात अशी माहिती समोर आली आहे की, दोन्ही अधिकाऱ्यांची भूमिका संशयित आढळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान आर्यन खानला 3 ऑक्टोबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानसह १९ जणांना अंमली पदार्थ बाळगल्यामुळे आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनडीपीसी अॅक्ट अंतर्गत एनसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आर्यन खान आणि १७ जणांना जामीन मंजुर करण्यात आला आहे तर दोन आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.


हेही वाचा : Jayshree Patil : गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील फरार, एसटी कर्मचाऱ्यांचे ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -