घरताज्या घडामोडीNawab Malik ED enquiry: मलिकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचं काम राऊतांना दिलंय का?,...

Nawab Malik ED enquiry: मलिकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचं काम राऊतांना दिलंय का?, आशिष शेलारांचा सवाल

Subscribe

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच यंत्रणांवर दबाव आणि हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय, अशा प्रकारचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. सर्व गोष्टी समोर येत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचं काम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलंय का?, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. या यंत्रणा जर कायद्याअंतर्गत काम करत असतील आणि काहीही शंका असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि आपल्या सरकारसह सहकारी पक्षाला वाचवण्यासाठी तुम्ही दाऊद आणि त्यांच्या हस्तकांच्याबाबतीत ईडी आणि एनआयए चौकशी करत आहे. त्यावर तुम्ही दबाव आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करताय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत का?

जेव्हा तपास यंत्रणा आपलं काम करतात. त्यावेळी तपास यंत्रणांकडून कोणावर कारवाई केले जाते आणि जे आरोपी संशयीत असतात, अशा आरोपी किंवा संशयीत असलेल्या लोकांची उत्तर देता येत नाहीत. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नाहीत का?, कोणतीही तपास यंत्रणा जर कारवाई करत असेल तर तपास यंत्रणांच्या बाबतीत मनात शंका असेल तर न्यायालयाचं दार ठोठावू शकता. यामध्ये काहीही चुकीचं होऊ नये, यासाठी जनतेचा दरबार आहे, असं शेलार म्हणाले.

- Advertisement -

तपास यंत्रणांच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नाहीत म्हणून भाजपवर हल्लाबोल करायचा. परंतु अशा प्रकारच्या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. थयथयाट तेच लोकं करतात ज्या लोकांना प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. या प्रकरणाबाबत सत्य बाहेर येईल. कारण जी माहिती तुमच्याकडे आहे तेवढीच माहिती आमच्याकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरू आहे, ते आमच्या समोर सुरू आहे. एनआयए आणि ईडीकडून ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहेत. तेव्हा राज्याचे पोलीस आणि मुंबईचे पोलीस डोळे मिटून होते का? आणि सत्तेत बसलेल्यांना याची माहिती नाहीये का? तसेच तपास यंत्रणा गेल्या दोन आठवड्यांपासून काय करत आहेत, असे अनेक प्रश्न शेलारांनी उपस्थित केले.

पैश्यांची गुंतवणूक कुठे केली जातेय?

दाऊदचा पैसा आणि त्याची मालमत्ता, निकटवर्तीयांची मालमत्ता तसेच त्यांच्या पैश्यांची गुंतवणूक कुठे केली जातेय. त्यांच्या मालमत्ता कशा वाचवल्या जात आहेत. हा पैसा कोणत्यातरी धंद्यात वापरला जात आहे की तो पैसा आतंकवादाला वापरला जातोय. अशा प्रकारच्या संशयाच्या बातम्या आल्यामुळे त्याच्यावर कामं सुरू आहेत. मग या चौकश्या करायच्या नाहीत का?, असं शेलार म्हणाले.

- Advertisement -

दाऊद इब्राहिमचे हस्तक कोण ?

दाऊद इब्राहिमचे हस्तक कोण आहेत. दाऊदची बहीण हसिना पारकरनंतर जर अन्य लोकांच्या प्रॉपर्टीस बळकावल्या जात असतील. तर त्यावर केंद्रीय तपास यंत्रणा डोळे मिटून गप्प का आहे. यंत्रणांवर दबाव आणि हल्ला करण्याचे प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष गुन्हेगार आणि आतंकवाद्यांचं समर्थन करण्याची भूमिका घेताहेत का?, असं शेलार म्हणाले.


हेही वाचा : Nawab Malik ED enquiry: मलिकांची ५ तासांपासून ईडीकडून चौकशी, ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -