घरताज्या घडामोडीआघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर "धर्मभास्कर वाघांचे" आश्रयदाते - आशिष शेलार

आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते – आशिष शेलार

Subscribe

राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घनाघाती शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर धुळे येथील पत्रकार परिषदेत हल्ला चढवला. धुळे दौऱ्यात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.  आमदार अँड आशिष शेलार हे तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्या नंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

धुळे जिल्हा परिषदेतील कोटय़वधींच्या अपहारप्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यां मध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्कर म्हणेल बाप रे बाब! असे चित्र सध्या आहे. पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले. अधिकऱ्यांमध्ये वाँर सुरु आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत. दलालांमार्फत बदलत्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे सरकारची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी राज्यात स्थिती पहायला मिळते आहे.

प्रशासनावर कुणाची पकड नाही. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे उघड होते आहेत.तर बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे एकिकडे राज्यात कोरोना, पाऊस, वादळ अशा आपत्तींनी थैमान घातले आहे, अशावेळी प्रशासनामध्ये यादवी माजली आहे.
कुणाचे कोण ऐकत नाही. राज्या शासनाच्या दिशाहीन कारभारामुळे राज्याची दिशा कोणती हे कळत नाही असे चित्र आहे.
सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्ष प्रमुखां विषयी वक्तव्य येतात , त्यावरून वाद होतात तीनही पक्षांमध्ये बेदली माजलेली आहे या बेदलीमुळे नेतृत्वाची बेअदबी ते करीत आहेत.

- Advertisement -

शेतकरी, कामगार, श्रमिक, अलुतेदार, बलुतेदार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही. म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेचा आवाज बनतो आहोत. या सरकार विरोधात ऐल्गार आम्ही करु, असेही त्यांनी सांगितले.

विमानतळावर टक्केवारीच आंदोलन

शिवसेने केलेल्या आंदोलनाच्या प्रश्नावर उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने देण्यात आले. आज जे बोलत आहेत तेव्हा पाळण्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का लावल्यास भाजप विरोध करेल. आहे आणि राहील.
मात्र हस्तांतरणाचा ठराव कँबिनेट मधे कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना मग बाहेर आंदोलन कशाला ? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही ? जे नावब मलिक याबाबत आज बोलत आहेत ते सरकार मध्ये आहेत. मग अदानीच्या विरोधात कारवाई का करित नाहीत? अदानीं कंपनीला विमानतळ हस्तांतरण करणारा जो ठराव ठाकरे सरकारने मंजूर केला तो मग रद्द का करित नाहीत? ते धाडस नवाब मलिक दाखवतील काय? आतून सपोर्ट आणि बाहेरून विरोध असे सध्या सुरू आहे. अदानींचे सरकार मधील कुणाशी संबंध आहेत हे आता महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. त्यामुळे विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायच अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत.

सरकारचे पितळ उघडे पडण्याची भिती वाटतेय का?

राज्यपालांच्या दौऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, राज्यपाल महोदय हे कुलपती आहेत. याचा विसर राज्य सरकारला आणि मंत्र्यांना पडला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थाची जी आमंत्रणे देतात त्यांना राज्यपाल जात आहेत. कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रपतींंना वास्तव माहिती ते देत आहेत त्यात गैर काय? जनतेच्या विषयावर प्रश्नांवर ते काम करीत आहेत त्यात चुकीचे काय? राज्य सरकारला भीती कशाची वाटतेय? राज्यात ईडी नको, सीबीआय नको, विरोधी पक्षनेत्यांनी दौरे करु नये असे सांगून त्यांचे दौरेही नको, आता राज्यपाल त्यांच्या अधिकारात काम करीत आहेत तेही नको… राज्य सरकारला भिती कशाची वाटतेय? कसले पितळं उघडे पडेल असे वाटतेय का? असा सवाल ही भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -