घरताज्या घडामोडीतिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर...

तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Subscribe

अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले

राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कामकाजावर आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारविरोधात आवाज प्रश्न केला तर जीव जाईपर्यंत मारलं जातंय, आमदारांना निलंबित करण्यात येत आहे. तर सीबीआय आणि न्यायालयाचे आदेश राज्य सरकार मानतही नाही यामुळे हे काय”द्यायचे” राज्य आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांनी ५ मुद्द्यांवर राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला गेलाय. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले आहे. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. सरकार न्यायालयाचे आदेशही मानत नाहीत. अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले असल्याचा प्रकार घडला आहे. राज्यातील गुन्हेगारी आणि राज्य सरकारचा कारभार यावरुन आशिष शेलार यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये तिघाडी मिळून राज्य सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची फसगत

आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पण हे कार्यालय वापरामध्ये ३ महिन्यांपुर्वीच आले आहे. जे कार्यरत सेवेत कार्यालय आहे. त्या कार्लायलाचं कार्यक्रमाच उद्घाटन करुन सेवेत कार्यरत करण्याचे कारण काय आणि त्याच्या मागचा अट्टहास काय आणि मग विषय अट्टहासाचा आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये बसलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत असा माझा आरोप असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -