घरमहाराष्ट्रराज्य दुष्काळ सदृश आणि पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

राज्य दुष्काळ सदृश आणि पालकमंत्री अदृश्य – अशोक चव्हाण

Subscribe

अखिल भारतीय किसान सभा आयोजित शेतकरी हक्क परिषद आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न होत आहे. या परिषदेमध्ये अशोक चव्हाण यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. सरकारने गंभीर दुष्काळ आणि अति गंभीर दुष्काळ जाहीर केला. पण असे काहीच नसते असे म्हणत ते म्हणाले की राज्य दुष्काळ सदृश आणि पालकमंत्री अदृश्य अशी आज अवस्था असल्याचे चव्हाण म्हणाले.

माकपच्या व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र कसे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र आम्ही सगळे एकत्र यावे, ही जनतेची इच्छा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. केवळ ३० टक्के मते मिळालेले लोक आज सत्तेत आहेत आणि ७० टक्के मते मिळवणारे विरोधात बसले आहेत. त्यामुळे हे सरकार कुणाचेच भलं करणार नाही, अशी लोकांची भावना झालेली आहे. आज होत असलेली परिषद ही फक्त शेतकरी, सामान्य वर्गासाठी नसून महाराष्ट्राचे धोरण ठरवणारी ठरेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -
अशोकराव आता तुमचं सरकार येईल – जयंत पाटील

फडणवीस नाही तर फसवणीस सरकार

अशोक चव्हाण राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, सरकार फक्त घोषणा करते पण त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणूनच हे फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. या सरकारने हमी भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र उघडण्याची घोषणा केली, मात्र तशी निवडकच केंद्र सुरू करण्यात आली आहेत. एकेकाळी राज्य विकासात आणि गुंतवणुकीत आघाडीवर होते. मात्र गेल्या चार वर्षात राज्य शेतकरी आत्महत्येत आघाडीवर आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

किसान सभेत ‘चलो दिल्ली, घेरो संसद’चा नारा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -