घरमनोरंजनसमीक्षकांनी नाकारूनही कमावले १०० कोटी

समीक्षकांनी नाकारूनही कमावले १०० कोटी

Subscribe

आमिर आणि अमिताभ यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटाला समीक्षकांनी नाकारूनही तीन दिवसात १०० कोटींची कमाई मिळाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असणारा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन एकत्र काम करत असणाऱ्या या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा होत्या. मात्र समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल अतिशय खराब समीक्षा लिहिली. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट म्हणजे हॉलीवूड चित्रपटाची कॉपी असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र तरीही आमिर आणि अमिताभ यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांमध्येच बऱ्याच समीक्षकांनी या चित्रपटाची टर उडवून चित्रपटाची कथा वाईट असल्याचं म्हटलं. बऱ्याच वेबसाईटने तर व्हिडिओ बनवूनदेखील हा चित्रपट कसा वाईट आहे याबद्दल सांगितले. त्यामुळे इतकी वाईट पब्लिसिटी झाल्यानंतर चित्रपट कमाई करणार नाही असा अंदाज होता. मात्र या चित्रपटाला समीक्षकांनी नाकारूनही तीन दिवसात १०० कोटींची कमाई मिळाली आहे. यावर्षी अनेक चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत.

किती आहे चित्रपटाची नक्की कमाई?

‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ने पहिल्याच दिवशी तब्बल ५२.७५ कोटी कमावले त्यानंतर तीन दिवसात १०० कोटी या चित्रपटाने कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २८.२५ कोटींचा टप्पा पार केला तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २२.७५ कोटींचा व्यवसाय केला. हिंदीमधील ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ने तीन दिवसात १०१.७५ कोटी कमावले असून तामिळ, तेलुगू या भाषेत १०५ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट तब्बल पाच हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. जोरदार मार्केटिंग केल्यामुळेच चित्रपटाची कमाई झाल्याचं सध्या चित्र आहे. त्याशिवाय तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्यामुळेही या चित्रपटाची कमाई जास्त झाल्याचं दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -