घरमहाराष्ट्रसंजय राऊत तिखट असले तर, आम्हीही चिकट

संजय राऊत तिखट असले तर, आम्हीही चिकट

Subscribe

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकीकडे सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना, महायुतीतील घटक पक्षांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यावेळी आम्हाला एकच मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी करताना देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

तसेच, संजय राऊत यांची भूमिका हळूहळू बदलत आहे. शिवसेना सरकारमध्ये येणार आहे. त्यामुळे संजय राऊत तिखट असले तरी आम्ही चिकट आहोत, असेही आठवले यांनी म्हटले आहे. महायुतीतील मित्र पक्षांची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

आमच्या चार पक्षांना चार मंत्रिपद मिळावी अशी अपेक्षाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिलेला असताना सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र बसून चर्चा करावी आणि लवकरच तोडगा काढावा असा सल्लाही आठवलेंनी यावेळी दिला. मुख्यमंत्रीपदासहीत सगळे काही ५०-५० हवे असे शिवसेनेने म्हटले आहे. हा सगळा पेच सुरु असतानाच रामदास आठवले यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -