घरदेश-विदेशअयोध्या राम मंदिर उद्घाटनावेळी..., संजय राऊतांकडून भीती व्यक्त; 'इंडिया'च्या बैठकीत करणार चर्चा

अयोध्या राम मंदिर उद्घाटनावेळी…, संजय राऊतांकडून भीती व्यक्त; ‘इंडिया’च्या बैठकीत करणार चर्चा

Subscribe

मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीत अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनावेळी सत्ताधाऱ्यांकडून घातपात घडवण्याचा हेतू असल्याची भीती देशाभरातील प्रमुख राजकीय पक्षांना वाटते आहे. त्यामुळे आम्ही मुंबईतील बैठकीत यावर चर्चा करू, अशी माहिती शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (At the inauguration of Ayodhya Ram Temple Sanjay Raut expressed fear Discussion will be held in India meeting)

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणे अशक्य; छत्रपती संभाजीराजेंच्या दाव्यावर रोहित पवारांनी भाजपावर साधला निशाणा

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून ट्रेन अयोध्येला बोलावून एखाद दुसऱ्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून देशामध्ये जात-धर्माच्या नावाखाली त्या काळात आगडोंब उसळणार नाही ना? अशी भीती आता लोकांना वाटू लागली आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी हे काही करू शकतात. जर पुलवामा घडवलं जाऊ शकतं, गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे एक अवर्गीकृत निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी काहीही करू करू शकतात, अशी भीती या देशातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांना वाटते आहे. ‘इंडिया’च्या बैठकीत यावर चर्चा होईल. आम्ही अत्यंत सावध आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांना याचपार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला भीती का वाटते आहे? ते म्हणाले की, आम्हाला ही भीती आहे, कारण हेच सत्य आहे. अशी भीती लोकांच्याही मनात आहे. जे राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचे नाटक करू शकतात. पुलवामामध्ये घृणास्पद काम करू शकतात. निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामामध्ये हल्ला झालेला आहे. असा आरोप राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. गोध्राबाबतही लोक असेच म्हणतात. कारण लोकांच्या मनात शंका आहे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पवारांनीच भुजबळांना तेलगी प्रकरणातून वाचवले! जितेंद्र आव्हाड यांचे संकेत

2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करायचे काम सत्ताधारी करू शकतात. आम्हाला भीती वाटते, आमच्या मनात शंका आहे की, अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी देशभरातून लोकांना बोलावले जाईल आणि रेल्वे सुनसान जागी आल्यावर दगडफेक केली जाईल, रेल्वेवर आगीचे गोळे फेकले जातील आणि संपूर्ण देशात दंगली भडकवल्या जातील. या प्रकाराची शंका लोकांच्या मनात आणि प्रमुख राजकीय पक्षाच्या मनात आहे. शंका लोकांसमोर मांडणे हे आमचे काम आहे. आमची शंका चुकीची असेल तर सरकारची जबाबदारी आहे, अशा काही घटना घडणार असतील तर त्या थांबवायला हव्यात. हरियाणात ज्या प्रकारे दंगली भडकवल्या जात आहेत, हे ताजे उदाहरण आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -