घरमहाराष्ट्रऔरंगाबादेत ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, 'या' गोष्टी राहणार बंद

औरंगाबादेत ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, ‘या’ गोष्टी राहणार बंद

Subscribe

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्या प्रशासनाने महत्त्व निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत पुन्हा अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे.११ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत, तसेच वाढत्या संक्रमणामुळे जिल्ह्यातील लग्न समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहे. रात्री ९ पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री ११ पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत.

राजकीय सभा, शाळा, महाविद्यालयं बंद पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये सक्तीचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या ४५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ५२, १०३ वर जाऊन पोहचला आहे. तर आत्तापर्यंत ४७, ९०९ रुग्णांना उपचारानंतर बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन पून्हा जाहीर करण्यात आला आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -