घरताज्या घडामोडीधक्कादायक! औरंगाबादमध्ये ९० नवे रुग्ण, बाधितांचा आकडा ४६८ वर

धक्कादायक! औरंगाबादमध्ये ९० नवे रुग्ण, बाधितांचा आकडा ४६८ वर

Subscribe

औरंगाबादमध्ये आज ९० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून यामध्ये एसआरपीएफच्या जवानांचा अधिक समावेश आहे.

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये गुरुवारी १७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी ३७३ वर गेली होती. दरम्यान, आज तब्बल ९० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा ४६८ वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे या नव्या बाधितांमध्ये एसआरपीएफचे जवान सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. हिंगोलीपाठोपाठ औरंगाबादमध्येही एसआरपीएफच्या जवानांना करोनाची लागण झाल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली असून औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये आतापर्यंत ३० जण कोरोनामुक्त झाले असून १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एसआरपीएफ कॅम्प ७२, जयभीम नगर ४, बेगमपुरा ४, भीमनगर, भावसिंगपुरा, शाह बाजार, ध्यान नगर, गारखेडा, एन-२ लघू वदन कॉलनी, मुकुंदवाडी, कटकट गेट आणि सिकंदर पार्क येथे प्रत्येकी एक आणि बायजीपुरा येथील ३ रुग्ण आहेत. तर खुलताबाद येथे एक बाधित आढळून आला आहे. यामध्ये ८३ पुरुष आणि ७ महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एसआरपीएफच्या १०६ जवानांची चाचणी

औरंगाबादमधून मालेगावात ड्युटीसाठी एसआरपीएफचे १०६ जवान गेले होते. ड्युटी संपवून हे जवान औरंगाबादला परतले, त्यावेळी या जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमध्ये अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगाव शहर करोनाचे हॉटस्पॉट होते. त्यामुळे या जवानांना तिथेच करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, या जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी हे जवान राहत होते तो परिसर सील करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बॉईज लॉकर रुम प्रकरण : बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -