पुढील तीन दिवसांत अविनाश भोसले रुग्णालयातून कारागृहात; कोर्टाने दिले आदेश

भोसले यांना सीबीआयने गेल्या वर्षी २६ मे रोजी अटक केली होती आणि नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना ताब्यात घेतले होते. ऑक्टोबर २०२२ पासून ते उपाचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. भोसले यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(AIIMS)च्या तज्ञ्ज डॉक्टरांचे पथक नेमावे अशी मागणी सीबीआयने विशेष न्यायालयात केली होती. अखरे न्यायालयाने भोसले यांच्या आरोग्याची चाचणी करुन त्यांना तीन दिवसांत पुन्हा कारागृहात पाठवण्याचे आदेशच बुधवारी दिले.

मुंबईः डीएचएफएल व येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना तीन दिवसांत रुग्णालयातून परत कारागृहात पाठवण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. सेंट जार्ज रुग्णालयात सध्या भोसले यांच्यावर उपचार सुरु आहेत. जे. जे. रुग्णालयात तपासणी व चाचणी करुन भोसले यांना परत तुरुंगात पाठवा, असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

भोसले यांना सीबीआयने गेल्या वर्षी २६ मे रोजी अटक केली होती आणि नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना ताब्यात घेतले होते. ऑक्टोबर २०२२ पासून ते उपाचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. भोसले यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(AIIMS)च्या तज्ञ्ज डॉक्टरांचे पथक नेमावे अशी मागणी सीबीआयने विशेष न्यायालयात केली होती. अखरे न्यायालयाने भोसले यांच्या आरोग्याची चाचणी करुन त्यांना तीन दिवसांत पुन्हा कारागृहात पाठवण्याचे आदेशच बुधवारी दिले.

ईडीने येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात एकूण ४१५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आली होती. ही मालमत्ता पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले आणि बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत होते. ईडीने भोसले यांच्याशी संबंधित १६४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर, तर छाब्रिया यांच्याशी संबंधित २५१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलला ३ हजार ९८३ कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यातील ६०० कोटी रुपये कपूर कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या डू इट अर्बन वेंचर्स इंडिया प्रा. लि.कंपनीला कर्जाच्या रूपाने देण्यात आले होते. तर वांद्रे रेक्लेमेशन प्रकल्पासाठी येस बँकेने आणखी ७५० कोटींचे कर्ज डीएचएफएल कंपनीच्या समूहातील आर.के.डब्ल्यू डेव्हलपर प्रा. लिमिटेडला दिले. ती रक्कम कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी इतरत्र वळवली, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

भोसले यांना वरळीतील एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम आणि करार, वित्तीय मूल्यांकन आणि संरचना आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपने डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील २९२ कोटी ५० लाख रुपये भोसले यांच्यामार्फत इतरत्र वळवण्यात आले होते. दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप आहे.