घरमहाराष्ट्रनागपूरBacchu Kadu : अमरावतीच्या जागेवर प्रहारचा दावा, नवनीत राणांनाही ऑफर; कडूंची नेमकी...

Bacchu Kadu : अमरावतीच्या जागेवर प्रहारचा दावा, नवनीत राणांनाही ऑफर; कडूंची नेमकी रणनीती काय?

Subscribe

अमरावतीच्या राजकारणात रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. यातच बच्चू कडू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. असे असतानाच रवी राणा यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठतेचे संबंध आहेत. असे असतानाच आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर राणा विरुद्ध कडू असा वाद रंगण्याची चित्रं आहेत.

अमरवती : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास राज्यात सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक पक्ष या ना त्या जागेवर दावा ठोकत आहेत. यामध्ये बच्चू कडूसुद्धा मागे नसून त्यांनी थेट अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे. एवढेच नाही तर त्यांनी थेट विद्यमान खासदार नवनीत राणा यांना ऑफर दिली असून, त्यांनी प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असे म्हटले आहे. तेव्हा बच्चू कडूंची नेमकी रणनीती काय? अशी चर्चा सध्या विदर्भाच्या राजकारणात रंगली आहे. (Bacchu Kadu Claims to attack Amravati seat offers to Navneet Rana too What is the exact strategy of Kadu)

अमरावतीच्या राजकारणात रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. यातच बच्चू कडू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. असे असतानाच रवी राणा यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठतेचे संबंध आहेत. असे असतानाच आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर राणा विरुद्ध कडू असा वाद रंगण्याची चित्रं आहेत. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांनी अमरावती मतदार संघावर दावा ठोकला असून, नवनीत राणा यांनासुद्धा ऑफर देऊन टाकली आहे. बच्चू कडूंनी असे करण्यामागे राणा दाम्पत्याची गोची करण्याचा तर हा डाव नसावा ना अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Amol Kolhe : अमोल कोल्हेंना पाडण्याचा काहींनी विडा उचललाय…, Jayant Patil यांची अजित पवार यांचे नाव न घेता टोलेबाजी

काय म्हणाले बच्चू कडू?

अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा सांगताना बच्चू कडू म्हणाले की, सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय बार्गेनिंग करतो. आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभाएवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : “EVM आहे तर शक्य”, संजय राऊत यांची BJPच्या घोषवाक्यावर टीका

रवी राणा म्हणाले- त्यांनी भूमिका स्पष्ट करावी

बच्चू कडू यांच्या खळबळजनक दाव्यानंतर आमदार रवी राणा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, सध्या नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्यांनी मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांच्यासमोर सध्या कुणी उभं राहण्याजोगाही उमेदवार नाही. तर बच्चू कडू हे एकीकडे एनडीएच्या बैठकीत हजर राहतात आणि दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून विकासकामांसाठी निधी खेचून आणतात. त्यांनी त्यांची तळ्यात मळ्यात असणारी भूमिका स्पष्ट करावी अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -