ठाकरे कुटुंबीयांमधील “ही व्यक्ती” शक्तीस्थळावर राहणार हजर, अनिल देसाईंनी केलं स्पष्ट

Balasaheb Thackeray 9th Memorial Day tejas thackeray present shivtirth said anil desai
ठाकरे कुटुंबीयांमधील "ही व्यक्ती" शक्तीस्थळावर राहणार हजर, अनिल देसाईंनी केलं स्पष्ट

शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनी प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय शक्तीस्थळावर हजर राहणार नाहीत अशी चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनेच्या आणि कंबरेच्या दुखण्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे उपचारार्थ ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरेसुद्धा आहेत. यामुळे कुटुंबीयांमधील सदस्य बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर येणार नसल्याची शक्यता होती. परंतु बाळासाहेबांचे नातु तेजस ठाकरे हजर राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर शिवसैनिकांनी अलोट गर्दी होत असते. ठाकरे कुटुंबीयही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हजर राहतात परंतु पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांमधील एकही सदस्य बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शक्तीस्थळावर येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे बायोबबलमध्येच आहेत. यामुळे त्यांना स्मृतीस्थळी येणं शक्य नाही. परंतु तेजस ठाकरे हजर राहणार असून इतर सदस्य त्यांच्या वेळेप्रमाणे हजर राहतील असे अनिल देसाई म्हणाले.

शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत नाही आहेत. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाली आहे. उपाचारार्थ ते रुग्णालयात दाखल झाले होते. पोस्ट सर्जरीचे उपचार महत्त्वाचे असतात कारण कोरोनाचा धोका अजून टळला नाही. त्यामुळे उपाचरार्थ दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे तेजस ठाकरे हजर राहणार आहेत. जे कोण व्यवस्थितरित्या वेळेप्रमाणे येऊ शकतात ते येतील अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे परदेश दौऱ्यावर

बाळासाहेब ठाकरे यांचे नातु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे परदेश दौऱ्यावर आहेत. वातवारणीय बदलावर आयोजित कॉप२६ या परिषदेला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यासाठी आदित्य ठाकरे परदेशात गेले आहेत. त्यांच्यासोबत मावसभाऊ आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई देखील आहेत. यामुळे ठाकरे कुटुंबीयांपैकी कोण बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हजर राहणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नवव्या स्मृतीदिनी शक्तीस्थळावर ठाकरे कुटूंबीयांची गैरहजेरी ?