घरताज्या घडामोडीस्वातंत्र्य भीक असे संबोधणाऱ्यांना बाळासाहेबांनी पाच फूट जमिनीत गाडले असते, राऊतांचा घणाघात

स्वातंत्र्य भीक असे संबोधणाऱ्यांना बाळासाहेबांनी पाच फूट जमिनीत गाडले असते, राऊतांचा घणाघात

Subscribe

देशाला १९४७ ला भीकमध्ये स्वातंत्र्य मिळाले असे संबोधणाऱ्यांची हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात गांजाची नशा उतरवली असती आणि त्यांना ५ फूट जमिनीत गाडले असते असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात केला आहे. शिवतीर्थावरील महायोद्धा या मथळ्याखाली राऊतांनी विरोधी पक्ष आणि स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असे संबोधणाऱ्यांवर चांगलाच शब्दांचा मारा केला आहे. तसेच बाळासाहेब हवे होते अशी परिस्थिती झाली असल्याचे राऊत म्हणाले. संकटाचे वादळ घोंगावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली का लोकांना बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब आज हवे होते परंतु ते शिवतीर्थावर विसावले आहेत. पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे. बाळासाहेब एका योद्ध्यासारखे शिवतीर्थावरुन बळ देत आहेत असे संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत स्वातंत्र्य भीक मिळाले असे म्हणाऱ्यांवर तसेच जे हिंदूत्वावर लेक्चर देतात त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी ९ वा स्मृतीदिन साजरा होत आहे. राऊतांनी अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केलं आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात हवे होते अशी देशाची परिस्थिती झाली आहे. बाळासाहेब असते तर जे आता स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत, जे हिंदुत्वावर बोलत आहेत त्यांची बोलण्याची हिंमत जाली नसती.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्य भीक मिळाले असे म्हणाऱ्यांवर निशाणा साधत म्हटलं आहे की, सध्या देशात नवा इतिहास रचला जात आहे. स्वातंत्र्याची नवी व्याख्या, नवी व्यवस्था रचण्यात येत आहे. १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक असून २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा काही गांजाड्यांना साक्षात्कार झाला आहे. त्या गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकाचा झुरका घेऊन महाराष्ट्रातील गांजाडी त्यांच्या हो ला हो करत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सामील असलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना भिकारी असे संबोधणाऱ्यांची बाळासाहेबांनी गांजाची नशा एका दमात उतरवली असती आणि त्यांना ५ फूट जमिनीत गाडले असते. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्या गांजाच्या शेतीचे समर्थन करुन स्वातंत्र्य क्रांतीकारकांचा अवमान करीत आहे. म्हणून लोकं म्हणतात की आज बाळासाहेब हवे होते. बाळासाहेब ठाकरे हे फक्त नाव नाही तर गर्जनाच होती असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

एक योद्धा शिवतीर्थावरून बळ देत आहे

हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. ‘मातृभूमी’ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर ‘लेक्चर’ देतात. तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे. एक योद्धा शिवतीर्थावरून बळ देत आहेत ते महायोद्धाच होते, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नवव्या स्मृतीदिनी शक्तीस्थळावर ठाकरे कुटूंबीयांची गैरहजेरी ?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -