घरमहाराष्ट्रशिंदेच्या 'बाळासाहेबांची शिवसेना'नंतर, आता मनसेचं 'बाळासाहेबांचा राज'

शिंदेच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’नंतर, आता मनसेचं ‘बाळासाहेबांचा राज’

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत म्हणून खरी शिवसेना ही आमची आहे असं म्हणत शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना असा नवा गट निर्माण केला. तर दुसरीकडे वारसा हा वास्तूंचा नसतो विचारांचा असं मनसेतर्फे नेहमीच बोलल जातं आहे, अशात आता मनसे देखील ‘बाळासाहेबांचा राज’ अशा आशयाचं नाटक घेऊन आलीय. नेमकं हे नाटक कशावर आधारित आहे, याचे दिग्दर्शक कोण, कोण भूमिका साकारणार हे जाणून घेऊ…

महाराष्ट्रामध्ये एकीकडे राजकीय स्थित्यांतरे घडताय. तर दुसरीकडे शिवसेनेच्या अस्तितवाची लढाई सुरू आहे. या सर्व राजकीय घडामोडी सुरू असताना शिवसेनेतून बाहेर पडलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यावर आधारीत नवं नाटक प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या नाटकातून आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

balasahebancha raj drama based on raj thackeray balasaheb thackeray relation coming on stage 23 january

23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या नाटकाचा शुभारंभ होत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज यांचे नाते, पक्षांतर्गत होणाऱ्या राजकीय घडामोडी, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीची परिस्थिती या सर्व घटना मांडल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. यामुळे तमाम रसिक प्रेक्षकांचे तसेच राजकीय मंडळींचे या नाटकाकडे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक अनिकेत बंदरकर असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 4 वाजता नाटकाचा शुभारंभ होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शानंतर हे नाटक तयार झाले आहे. यासह नेते अविनाश जाधव कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांचे नाटकाला विशेष सहकार्य लाभले आहे. ठाण्यात काल अविनाश जाधव यांनी नाटकाच्या पोस्टरचे अनावरण केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -