घरताज्या घडामोडीTripura Violence: तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू; राणेंचा इशारा

Tripura Violence: तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू; राणेंचा इशारा

Subscribe

त्रिपुरातील मुस्लिमांवरील कथित हल्ले आणि मोहम्मद पैगंबरांबद्दल कथितपणे वापरण्यात आलेले अपशब्द या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. काल, शुक्रवारी अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण आले. त्याचप्रमाणे आजही अमरावतीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. मात्र पुन्हा अमरावतीत बंदला हिंसक वळण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी सकाळी ट्वीट करून रजा अकादमीवर निशाणा साधला आहे. थेट संपवण्याची भाषा नितेश राणेंनी केली आहे.

आज सकाळी ट्वीट करत नितेश राणे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील ठिकठिकाणी हिंसा आणि दंगली उसळल्याच्यामागे अतिरेकी संघटना रजा अकदामीच आहे. नेहमी ते शांतात भंग करतात आणि सर्व नियमांचे उल्लघंन करतात. सरकार फक्त बसून बघत राहते. सरकारने रजा अकादमीवर बंदी घावली नाहीतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू,’ असा इशारा दिला.

- Advertisement -

यापूर्वी काल, शुक्रवारी नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला होता. ‘महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील,’ असा इशारा राणेंनी दिला होती.

- Advertisement -

आजही अमरावती बंदला हिंसक वळण

त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र अमरावती बंदला पुन्हा हिंसक वळण आले आहे. येथे मोठ्याप्रमाणात हिंसाचार आंदोलनकर्त्यांकडून होत असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकसुद्धा होत आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल अमरावतीत काढण्यात आलेल्या १५ ते २० हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चेकर्‍यांनी जयस्तंभ चौकातील आणि शहरातील विविध भागातील २० ते २२ दुकानांची प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकर्‍यांनी भाजप आणि रा. स्व. संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात तीन पोलीस जखमी झाले.


हेही वाचा – मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -