घरमहाराष्ट्रपुण्यात बांगलादेशी घुसखोरांची धरपकड; मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी टाकली धाड

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांची धरपकड; मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी टाकली धाड

Subscribe

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात धाड टाकत तीन संशयितांना पकडलं आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल ५० कार्यकर्त्यांनी पुण्यात बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी धाड टाकली. मनसेचे कार्यकर्ते बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. यावेळी तीन संशयित बांगलादेशी घुसरखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कुटुंब धनकवडीतील बालाजीनगरमध्ये राहतात. त्यांनी आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे असल्याचा दावा करत तशी ओखळपत्रेही त्या कुटुंबाकडून दाखविण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यानंतर मनसेने ठाणे, बोरिवली या भागात बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी ठाण्यातील किंगकॉंगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीदरम्यान कुटुंबाकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी गोष्टी मिळाल्या. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशचा पासपोर्टही सापडल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली होती.

बांगलादेशी, बिहारी की बंगाली?

धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या तपासात काही संशयित सापडले आहेत. त्यांच्याकडे काही कागदपत्रांची विचारणा केली असताना त्यातील काहींनी बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले तर काहींनी बंगाली असल्याचे सांगितले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. ही कुटुंब बालाजीनगरमधील गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये राहत होती.

- Advertisement -

याआधी विरार येथील अर्नाळा येथून २३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेने १३ फेब्रुवारीला बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात आंदोलन केले होते. या भागात अनेक दिवसांपासून काही बांगलादेशी महिला आणि पुरुष राहत असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चिकूवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -