घरगणपती उत्सव बातम्या'बाप्पा स्पेशल रेसिपी' स्पर्धा!

‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ स्पर्धा!

Subscribe

गणेशोत्सव म्हटल की गणेशमूर्ती, सजावट, देखावा यासोबतच पाक कलेलाही आपल्याइथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या विविध भागात गृहिणी परंपरेनुसार बाप्पांना विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवत असतात. यासाठीच आपल महानगर आणि माय महानगर यंदा ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ही स्पर्धा आयोजित करत आहे. अतिशय आगळ्यावेगळ्या या स्पर्धेत तुमचा पदार्थ आम्हाला व्हिडिओद्वारे पाठवा. माय महानगर या आमच्या वेब पोर्टलच्या युट्यूबवर तुमचा व्हिडिओ अपलोड करुन तुम्ही तयार केलेला विशेष पदार्थ लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही बनवत असलेला हटके पदार्थ किंवा नैवेद्य आम्हाला व्हिडिओ स्वरुपात पाठवायचे आहेत. पदार्थ बनवण्याआधी त्याचे साहित्य, बनविण्याची पद्धत (कृती) आणि पदार्थ बनल्यानंतरची झलक या तीन गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये अंतर्भूत असायला हव्यात. व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत केलेला असावा. व्हिडिओच्या सुरुवातील आपली ओळख, नाव, ठिकाण आणि पदार्थाचे नाव सांगा. हा व्हिडिओ पाच मिनिटांपर्यंतचा असावा.

- Advertisement -

एकदा व्हिडिओ शूट झाला की तो आम्हाला 75060 71006 या नंबरवर व्हॉट्सअप करा. जर व्हिडिओ पाठविण्यामध्ये काही तांत्रिक अडचण जाणवत असल्यास तुम्ही याच नंबरवर देखील संपर्क साधून आपले शंकानिरसन करु शकता. आपले व्हिडिओ आम्हाला २० ऑगस्टपासून ते अनंत चतुर्दशी (१ सप्टेंबर) पर्यंत पाठवू शकता.

आपले व्हिडिओ माय महानगरच्या वेबसाईट, फेसबुक आणि युट्यूबवर टाकले जातील. माय महानगरचे वाचक या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि व्ह्यूजच्या रुपात पसंती देतील. ज्या पाक कलेच्या व्हिडिओला ‘युट्यूब’वर सर्वाधिक लाईक, कमेंट आणि व्ह्यूज मिळतील त्याच पाक कलेला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. दि. १० सप्टेंबर रोजी विजेते आणि बक्षिसे जाहीर केले जातील. विजेते घोषित करताना माय महानगर परिक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.

- Advertisement -

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकष?

– तुम्ही बाप्पासाठी बनवत असलेला हटके पदार्थ, नैवेद्य आम्हाला व्हिडिओद्वारे पाठवा.

– पदार्थ बनवण्याआधी त्याचे साहित्य, बनविण्याची पद्धत (कृती) आणि पदार्थ बनल्यानंतरची झलक… या तीन गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये अंतर्भूत असायला हव्यात.

– व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत केलेला असावा.

– व्हिडिओच्या सुरुवातील आपली ओळख, नाव, ठिकाण आणि पदार्थाचे नाव सांगा.

– तुमचा व्हिडिओ पाच मिनिटांपर्यतचा असावा.

स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया

– तुमचा व्हिडिओ पुर्ण झाल्यानंतर तो आम्हाला 75060 71006 या नंबरवर व्हॉट्सअप करा.

– व्हिडिओ पाठवताना काही तांत्रिक अडचण आल्यास 75060 71006 या नंबरवर कॉल करावा.

– व्हिडिओ व्हॉट्सअप करताना आपली माहिती, संपर्क क्रमांक, पदार्थाचे नाव आणि आपले ठिकाण पाठवा.

– आपले व्हिडिओ २० ऑगस्टपासून अनंत चतुर्दशी (१ सप्टेंबर) पर्यंत आपण पाठवू शकता

विजेता निवडीची प्रक्रिया

– आपले व्हिडिओ माय महानगरच्या वेबसाईट, फेसबुक आणि युट्यूबवर टाकले जातील.

– माय महानगरचे वाचक या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि व्ह्यूजच्या रुपात पसंती देतील.

– व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवर टाकले जात असले तरी ज्या पाक कलेच्या व्हिडिओला ‘युट्यूब’वर सर्वाधिक लाईक, कमेंट आणि व्ह्यूज मिळतील त्याच पाक कलेला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.

– माय महानगर परिक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.

– दि. १० सप्टेंबर रोजी विजेते आणि बक्षिसे जाहीर केले जातील.

पाहा गणेशोत्सव स्पेशल रेसिपी!


हेही वाचा – ‘कोरोना विघ्नहर्ता स्पर्धेत’ सहभागी व्हा आणि रोख बक्षिसं जिंका!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -