जनाची नाही, मनाची लाज बाळगा; नारायण राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका

narayan rane and uddhav thackeray

कुडाळ – मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्षे काही केलं नाही. याला ते द्या, त्याला हेद्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ म्हणत आहेत. जनाची ना मनाची लाज बाळगा, सत्ता गेल्याने पायाखालची वाळ सरकली आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न करता केली. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये बोलत होते.

शिवरायांचं नाव घेऊन राज्य केलं. मात्र, फितुरी करून आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. आता पायाखालची वाळऊ सरकली आहे, पद गेलं आणि आणि वेड्यासारखे बडबडू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

नारायण राणे दोन महिन्यांत राजीनामा देतील असं वैभव नाईकांनी भर पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. यावर नारायण राणेंनी नाईकांचा समाचार घेतला आहे. जसं मला भेटून गेला आणि मी त्याला कानात सांगितलं. कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती. सांगायची गोष्ट वेगळीच. मी केंद्रीय मंत्री आहे. राजीनामा का देईन असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे, असे कौतुद्गारही त्यांनी काढले.

दरम्यान, निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवरायांचं नाव घेऊन राज्य केलं. मात्र, फितुरी करून आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही, असंही ते म्हणाले.