घरगणेशोत्सव 2022गणेशोत्सवात रात्र बससेवेतून बेस्टला साडेचार लाखांची कमाई

गणेशोत्सवात रात्र बससेवेतून बेस्टला साडेचार लाखांची कमाई

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पाच तलाव भरले आहेत. तर सहावा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. ही आनंदाची बातमी विघ्नहर्ता गणपती बाप्पाने मुंबईकरांना दिली. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमावरही कृपा दृष्टीचा वर्षाव केला आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पाच तलाव भरले आहेत. तर सहावा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. ही आनंदाची बातमी विघ्नहर्ता गणपती बाप्पाने मुंबईकरांना दिली. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमावरही कृपा दृष्टीचा वर्षाव केला आहे. गणेशोत्सवात अवघ्या दहा दिवसांत गणेश भक्तांसाठी रात्र बससेवेतून बेस्टला साडेचार लाखांची कमाई झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे तोट्यात चाललेल्या बेस्टच्या उत्पन्नात काहीशी भर पडली आहे. (BEST earn four and a half lakhs from night bus service during Ganeshotsav)

मुंबईचे खास आकर्षण म्हणजे येथील गणेशोत्सव. मुंबईतील मोठमोठ्या गणेशोत्सवांची शान बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. विशेषतः दक्षिण मुंबईत लालबागचा राजा, खेतवाडी, काळाचौकी, परळ, भायखळा, गिरगाव आदी परिसरातील मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळाचे गणेशोत्सव, भव्यदिव्य सजावट, आकर्षक व उंच गणेशमूर्ती हे सर्व पर्यटकांचे, गणेश भक्तांचे खास आकर्षण असते.

- Advertisement -

हजारो गणेशभक्त रात्रभर अगदी पहाटेपर्यन्त मुंबईत गणेश दर्शन घेत असतात. नेमकी बाब लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने गतवर्षीपेक्षाही यंदा जास्त बस सेवा उपल्बध केली. अगदी एसी बसगाड्याही रात्रीच्या वेळेत गणेश भक्तांसाठी उपलब्ध केल्या होत्या. या बससेवेचा गणेश भक्तांनी चांगला लाभ घेतला.

३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत बेस्टच्या रात्रीच्या बस गाड्यांमधून फिरून तब्बल २५,७१२ गणेश भक्तांनी गणेश दर्शन घेतले त्यामुळे बेस्ट उपक्रमाला ४ लाख ५३ हजार २६९ रुपये उत्पन्न मिळाले आहे.

- Advertisement -

गणेश भक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित हो-हो बस सेवा गणेश भक्तांच्या सेवेकरीता दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. ही बस सेवा 8 सप्टेंबर 2022पर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर 25 मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या या बस मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या आल्या होत्या.


हेही वाचा – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, रिकव्हरी दरही सुधारला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -