घरCORONA UPDATEराज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, रिकव्हरी दरही सुधारला

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, रिकव्हरी दरही सुधारला

Subscribe

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ७३० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, १०७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९८.१० टक्क्यांवर आलं आहे.

राज्यात आज चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मृत्यूदर १.८२ टक्के इतका झाला आहे. तसंच, राज्यात आतापर्यंत ७९,५८,१७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आात ९८.१० टक्क्यांवर आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात सध्या ७ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबईत १५७४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ठाण्यात हीच संख्या १०७२ झाली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ३६९ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, संपूर्ण देशभरात ४६ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मागील चार दिवसांतील ही आकडेवारी पाहाता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. रूग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना संपूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -