घरमहाराष्ट्रबेस्ट उपक्रम ग्राहकांचा खंडित वीजपुरवठा करणार त्वरित सुरळीत

बेस्ट उपक्रम ग्राहकांचा खंडित वीजपुरवठा करणार त्वरित सुरळीत

Subscribe

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात दिवस-रात्र कामधंदा चालू असतो. मुंबई शहर भागात बेस्ट वीज विभाग टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करून माफक दरात वीज ग्राहकांना वीज पुरवठा करतो

मुंबई -: यापुढे बेस्टच्या वीज ग्राहकांचा खंडित वीजपुरवठा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने सुरळीत करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्ट वीज विभागाच्या १० लाखांपेक्षाही जास्त वीज ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे. या संपूर्ण यंत्रणेसाठी बेस्ट उपक्रमाने यंदाच्या अर्थसंकल्पात ४८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात दिवस-रात्र कामधंदा चालू असतो. मुंबई शहर भागात बेस्ट वीज विभाग टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करून माफक दरात वीज ग्राहकांना वीज पुरवठा करतो. विशेषतः शहर भागात मोठमोठ्या कंपन्यांचे मुख्य ऑफिस आहेत. मंत्रालय, विधानसभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांची निवासस्थाने, विविध राजकीय पक्षांची कार्यालये आहेत.

- Advertisement -

मोठमोठे उद्योगपती यांचे बंगले, घरे आहेत. रुग्णालये, न्यायालये, विद्यापीठ आदी आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे जर वीज पुरवठा काही काळ अथवा दीर्घकाळ खंडित झाल्यास बेस्ट वीज विभागात वीज ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस पडतो. परिणामी बेस्ट वीज विभागात मोठी खळबळ उडते. बेस्टला एकाच वेळी सर्व वीज ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जर वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब झाल्यास बेस्ट वीज विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांकडून तात्काळ बेस्ट वीज विभागाकडे तक्रार येईल आणि तक्रार प्राप्त झाल्याबरोबर बेस्ट वीज विभागाची यंत्रणा तात्काळ वीज ग्राहकांच्या घरी, कार्यालयात जाऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाताळून वीज पुरवठा सुरळीत करेल. त्याबाबत बेस्ट वीज विभाग व ग्राहक यांच्यात मेसेजची देवाणघेवाण या अत्याधुनिक यंत्रणेमार्फतच होणार आहे. त्यामुळे बेस्ट वीज विभागाकडून ग्राहकांना आता खंडित वीज पुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र त्यासाठी बेस्ट वीज विभाग ४८७ कोटी रुपये खर्च करणार आहे. बेस्ट प्रशासनाने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या ४८७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

- Advertisement -

हेही वाचाः मोफत शिक्षण मग शिष्यवृत्ती कशाला?; मोदी सरकारने बंद केली अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -