घरमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरण : आरोपपत्रासाठी पोलिसांना मुदतवाढ

भीमा कोरेगाव प्रकरण : आरोपपत्रासाठी पोलिसांना मुदतवाढ

Subscribe

भीमा - कोरेगाव प्रकरणातील संशयितांचे आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणी माओवाद्यांशी संबध असल्याचा आरोप करत पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. या पाचही संशयितांच्या विरोधात तपास करुन आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला आणखी ९० दिवसांची मुदत मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांकडून शनिवारी दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा अर्ज मंजूर केला असून, संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन या आरोपींच्या अटकेला उद्या ९० दिवस पुरे होत आहेत. त्यामुळे वाढीव मुदतीच्या आत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो.

- Advertisement -

खरंतर पोलिसांच्या प्राथमिक अर्जावरची सुनावणी शनिवारीच घ्यावी अशी मागणी सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली होती. मात्र, आरोपींना अर्ज अभ्यासण्यासाठी कालावधी मिळावा असं सांगत, बचाव पक्षाचे वकील अॅड. रोहन नहार आणि अॅड. राहुल देशमुख यांनी सुनावणी सोमवारी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारी वकील उज्वला पवार यांनी या मागणीचा विरोध केला. सोमवारी उच्च न्यायलयात याप्रकरणी सुनावणी असल्यामुळे तपास अधिकारी उपस्थित राहू शकत नाही, असं पवार यांनी सांगितल्यामुळे अखेर रविवारी ही सुनावणी झाली.

कोण आहेत हे ५ संशयित आरोपी?

ताब्यात घेण्यात आलेले पाचही संशयित आरोपी मूळत: पत्रकार, सामजिका कार्यकर्ते आणि विचारवंत असल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती लेखिका देवकी जैन, प्रभात पटनायक, माजा दारूवाला, रोमिला थापर आणि सतीश देशपांडे यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या याचिकेत नमूद केली होती. दरम्यान अटक केलेले पाचही आरोपी सीपीआय या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य असल्याचं तपासातून समोर आलं आहे. दरम्यान अटक करतेवेळी या पाचही जणांकडून पेन ड्राईव्स, काही कागदपत्रं, डिव्हीडीज आणि हार्डडिस्क आदी वस्तू मिळाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -