बियरच्या विक्रीत या जिल्ह्यात मोठी वाढ, उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी

Big increase in beer sales in Nashik district
बियरच्या विक्रीत या जिल्ह्यात मोठी वाढ, उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी

कडक उन्हाळ्यामुळे शीतपेय तर कोणी थंड बियरचा आनंद घेतात. या उन्हाळ्यात बियरच्या मागणीत वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. कॉलेज तरुणाई सर्वाधिक बियरकडे आकर्षित होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आले आहे.

राज्यातील अनेक भागात एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 45 अंशावर गेला होता. नाशीकमध्ये ही एप्रिल महिन्यात वातावरण 40 अंशाच्या पुढे गेले होते. त्यामुळे गर्मीत ताक, उसाचा रस, कोल्ड्रिंक्स खरेदी करण्याबरोबर बियरला अधिक प्राध्यान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यात बियर विक्री –

नाशिक जिल्ह्यात बियर विक्रीचा आकडा गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात 7 लाख 40 हजार 31 लिटर एवढा होता. मात्र, यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात 20 तारखेपर्यंत बियरची विक्री 6 लाख 68 हजार 337 हजारा पर्यंत गेली आहे. उन्हाळ्यात बियर पिण्यास थंड वाटत असल्याने तिची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल, मे महिन्यात सुट्टीचे दिवस असल्याने नाशिकमध्ये बियरला अधिक पसंती मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील बियर विक्री – 

औरंगाबादमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात बिअरच्या विक्रीत वाढ झाली आहे. 2020-21 च्या मे महिन्यातील बीअर विक्री 63 लाख लिटर होती, ती या मे महिन्यात 248 लाख 45 हजार लिटरवर पोहोचली. या ऊन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात 403 कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढला आहे. 2020 – 21 मध्ये 50 कोटी 83 लाख रुपयांचा महसूल होता. या वर्षी महसूल 453 कोटी 83 लाख रुपयांवर गेला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या पहानीत तरुणाई बियर पिण्यात अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. बियरच्या विक्रीमुळे शासनाच्या महसुलात वाढ होत आहे. मात्र, ही चिंतेची बाब असून महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याच्या वयात तरुणाई बियर पिण्यात अग्रेसर असल्याचे असल्याचे दिसत आहे. बियरचे सेवन अधिक प्रमाणात झाल्यास थंड वाटणारी बियर अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते.