घरमहाराष्ट्रनाणारवरून प्रमोद जठार यांचा राजीनामा

नाणारवरून प्रमोद जठार यांचा राजीनामा

Subscribe

नाणारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या प्रमोद जठार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

ज्या नाणार प्रकल्पावरून कोकणात विरोधाचे रान उठले होते तो नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केली. मात्र आता नाणारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या प्रमोद जठार यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. नाणार प्रकल्पा रद्द केल्यामुळे कोकणातील तरुणांचा हातचा रोजगार हिरावला गेल्याचे सांगत मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जठार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्या सिधुदुर्ग जिल्ह्यात 

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. यावेळीच मुख्यमंत्र्यांना भेटून आपण राजीनामा देणार असल्याचे जठार यांनी सांगितले. कोकणामध्ये मागील ४ वर्षांत मोठी विकासाची कामे सुरू झाली असून, न भूतो न भविष्यती अशी कामे देखील सुरू झाली आहेत. पण काही जणांनी राजकीय भांडवल करत नाणार प्रकल्प रद्द केल्याची टीका जठार यांनी केली. नाणार प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार उपलब्ध झाला असता त्यामुळे जिल्ह्यमध्ये 80 टक्के रोजगार या निमिताने निर्माण झाला असता पण दुर्दैवाने हा प्रकल्प रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नाणार रद्द करून कोकणच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा हा प्रयत्न असून, नाणारच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये आता विरोध करणारी शिवसेनेची मंडळी देखील प्रकल्पाच्या बाजूने होती असा घणाघात देखील त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -