..त्यांना तुम्ही आव्हान देणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, उद्धव ठाकरेंवर अशिष शेलारांची टीका

bjp ashish shelar

मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शहांना आव्हान देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. त्यांनी आरसा घेऊन उभे राहण्याची गरज आहे. तुम्ही शिवसेनेचे 100 आमदार तरी निवडून आणले आहेत का? 100 सोडाच पण 75 चा आकडा तरी कधी पार केला आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. यावेळी त्यानी कौआ हंस की चाल नहीं चल सकता, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली.

त्यांनी आरसा घेऊन उभे राहण्याची गरज –

अमित शहांना आव्हान देण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे. त्यांनी आरसा घेऊन उभे राहण्याची गरज आहे. आपण ज्यांना आव्हान देतोयत त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत, हे त्यांना कळेल. स्वतःच्या हिंमतीवर तुम्ही एकदातरी महाराष्ट्रात सरकार आणले आहे का? तुम्ही शिवसेनेचे 100 आमदार तरी निवडून आणले आहेत का? 100 सोडाच पण 75 चा आकडा तरी कधी पार केला आहे का? असा सवालच आशिष शेलार यांनी केला. ज्या शहांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकदा नाही तर दोनदा शंभर आमदार निवडून आणले, त्यांना तुम्ही आव्हान देतात. म्हणजेच सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे सांगत कौआ हंस की चाल नहीं चल सकता, अशी टीकाही शेलार यांनी केली.

त्या वर्तणुकीला ठेचून काढले पाहीजे –

PFI प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्या वर्तणुकीला ठेचून काढले पाहीजे, अशी भाजपाच्यावतीने आमची गृहमंत्र्यांकडे मागणी आहे. ते या मागणीप्रमाणे निर्णय घेतली, अशी अपेक्षा आहे. PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते आहे, त्याविरोधात हा लढा असल्याचे आशिष शेलार म्हणाले.