Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? अतुल भातखळकर यांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? अतुल भातखळकर यांचा सवाल

झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यास गेलेल आहेत. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग आणि चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भेटीवर विरोधकांनी टीकास्त्र डागलं आहे. आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय जावाई का म्हणून नये असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळही दिल्लीत दाखल झालं आहे. राज्यात ज्वलंत असा विषय असलेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेतली आहे. मराठा आरणक्षणाचा राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मराठा आरक्षणाची केंद्रावर जबाबदारी असल्याचे राज्य सरकारकडून म्हटले जात आहे. यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चांगलीच टीका केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. “आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?” अशा आशयाचे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. तर मुख्यमंत्र्यांचा व्यंगचित्रात्मक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात. उद्धव ठाकऱ्यांना राष्ट्रीय जावाई घोषित करायला हवे असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -