घरताज्या घडामोडीविधानसभा स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा

विधानसभा स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा

Subscribe

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी भाजप स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास सज्ज आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याचीही भाजपची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना असून त्यानुसार संघटना काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपने केल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापि, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजप ठामपणे काम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहा जणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – अनिल परबांच्या रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवली ? ऑडिओ क्लिप व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -