घरमहाराष्ट्रईडी येताच अनिल देशमुख पळून गेले, पण त्यांना जेलमध्ये जावंच लागणार -...

ईडी येताच अनिल देशमुख पळून गेले, पण त्यांना जेलमध्ये जावंच लागणार – सोमैया

Subscribe

ईडीने शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील तीन ठिकाणांवर छापे मारले. यावर आता भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया देताना ईडीने छापे टाकतले तेव्हा अनिल देशमुख पळाले पण त्यांना एक दिवस जेलमध्ये जावंच लागणार आहे, असं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

ईडीच्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख पळून गेले, अशा शब्दात निशाणा साधला. “अनिल देशमुख आजपण ईडीच्या हाती नाही लागले. पळून गेले. काही लोकांना भीती आहे की विदेशात तर नाही निघून गेले. पण मी विश्वासाने सांगतो, आज, उद्या, परवा…कधीतरी ईडीच्या हाती लागणार आणि त्यांना जेलमध्ये जावं लागणार,” असं किरीट सोमैया म्हणाले.

- Advertisement -

देशमुखांच्या नागपुरातील त्यांच्या कॉलेजवर ईडीचे छापे

अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असून या प्रकरणात ईडीचे छापे अद्याप सुरु आहेत. शुक्रवारी देखील ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकले.

ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील तीन ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सकाळपासून छापेमारी सुरु आहे. अनिल देशमुख यांचं काटोलजवळ फेट्री येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाचं इंजिनीअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजवर देखील ईडीने छापा टाकला. या छापासत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या चमूसोबतच राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. अनिल देशमुख सध्या कुठे आहेत याची माहिती ईडीच्या अधिकार्यांनाही नाही, असं सांगितलं जातं आहे. त्या धर्तीवर अनिल देशमुख यांच्या कॉलेजवर आज घातलेला छापा हा त्यांच्यावरील कारवाईचा फास आवळला जात असल्याचे बोललं जात आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -