कोणत्या रश्मी ठाकरे खऱ्या?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरे यांच्या या सभेतील भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली.

Kirit Somaiya's serious allegation Thackeray government is trying to kill me
ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरे यांच्या या सभेतील भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला सोमय्या यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. “असली आणि नकली दोन्हीचं उत्तर मिळणार, जवाब भी मिलेगा करारा जवाब मिलेगा. असली क्या है नकली क्या है, मग ते हिंदूत्व असो की उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा विषय असो. उद्धव ठाकरेमध्ये हिंमत होती का उत्तर द्यायची.”, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत तर उद्धव ठाकरे नकली आहेत”, असे म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली. “तुमचं हिंदुत्व खोटं आहे. उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नाही. असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या 18 जणांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचा बोलवता धनी उद्धव ठाकरे हे आहेत. तुमचे अनेक मंत्री कोर्टात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत असेही सोमय्या यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंना न्यायालयाने उत्तर दिलं आहे. काल ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं”, असं सोमय्या यांनी म्हटलं.

किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “तुमच्यात हिंम्मत असेल तर स्पष्ट करा की, ते 19 बंगले कोणाचे आहेत. तसंच कोणत्या रश्मी ठाकरे खऱ्या आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याबाबत उद्धव ठाकरेच खरंकाय ते सांगू शकतात असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच, 2019च्या पत्रामध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहीलं होतं. यामध्ये त्यांनी अलिबागमध्ये माझे 19 बंगले आहेत. 2014 मी अन्वय नाईककडून विकत घेतले होते. तेव्हापासून हे बंगले आहेत. हे सर्व बंगले माझ्या नावावर करा.” लिहिल्याचे सोमय्यांनी सांगितलं. त्याचेवेळी त्यांनी दुसरं पत्र दाखवत या पत्रातील रश्मी उद्धव ठाकरे खऱ्या आहेत की, “या पत्रातील रश्मी उद्धव ठाकरे खऱ्या आहेत. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांचे 2021 चे पत्र दाखवले आणि या पत्रात रश्मी उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावावर 19 बंगले नव्हतेच केव्हाच नव्हते. एप्रिल 2014 मध्ये ज्यावेळी जागा घेतली, त्यावेळी सुद्धा हे बंगलो नव्हते”, असं लिहिल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरे हे डरपोक आहे. महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार करत आहेत. लबाडी कोण करतंय, रश्मी वहिनी लबाडी करू शकत नाही. पण त्यांचे पती उद्धव ठाकरे लबाडी करू शकतात. मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीसाठी लबाडी कराताहेत.”, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.


हेही वाचा – CNG Price Hike : सीएनजीच्या किंमतीत पुन्हा 2 रुपयांची वाढ