घरCORONA UPDATEभाजप खासदार नारायण राणे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

भाजप खासदार नारायण राणे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

Subscribe

राज्यामध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीगाठीचा ओघ वाढला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता भाजप खासदार नारायण राणेदेखील राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या उपाययोजना तसेच मोठ्या संख्येने स्थलांतरीत होणारे मजूर, कामगार या दोन महत्त्वाच्या विषयांवर राज्यपालांशी चर्चा हे राजकीय मंडळी करत असल्याचे सांगितले जात आहे.

दुपारी शरद पवारांनी घेतली भेट 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर आल्यापासून शरद पवारांनी पहिल्यांदाच राजभवनावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रफुल पटेल यांनी ट्विटरवर थोडक्यात तपशील दिला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्दयांची चर्चा केली असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. राजकीय नेत्यांच्या या राजभवनावरील वाऱ्या पाहून राज्यातील राजकारण हे वर्षावर कमी पण राजभवनावरच जास्त घडत असल्याचे यातून दिसून येत आहे.

- Advertisement -

नारायण राणे आणि राज्यपालांमध्ये काय चर्चा रंगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील राजकारणदेखील ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत असून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच भाजप नेत्यांनी केलेल्या माझे आंगण रणांगण या निषेध मोहिमेत ते पाहायला मिळाले.

हेही वाचा –

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गौडा यांच्यावर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -