घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून भाजप नेते निलेश राणेंची टीका, म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून भाजप नेते निलेश राणेंची टीका, म्हणाले…

Subscribe

शिवसेना पक्षात झालेले बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी जाहीर मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी ३० जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोर आमदारांवर आणि भाजपवर टीका केली. मात्र, या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राऊत या दोघांच्या मध्ये मागील बाजूस दिसणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची फ्रेम ही राजकीय हेतूने वापरण्यात आल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे. याबाबत निलेश राणें यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

इथे पण फरक –

- Advertisement -

मागच्या वर्षी उद्धव यांनी अशाच प्रकारे दिलेल्या मुलाखतीमधील फोटो आणि आजच्या मुलाखतीमधील फोटो एकत्र शेअर करत निलेश यांनी दोन्ही फोटोंची तुलना केली आहे. ‘इथे पण फरक’ असं म्हणत निलेश यांनी मागच्या वर्षीच्या फोटोवर ‘सत्ता होती तेव्हाची मुलाखत’ तर यंदाच्या फोटोवर ‘सत्ता गेल्यानंतरची मुलाखत’ असा मजकूर लिहिला आहे. या फोटोला देण्यात आलेली कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळची मुलाखत आणि बंद खोलीतील मुलाखत –

मागील वर्षीची मुलाखत घेताना सकाळच्या वेळेची निवड करण्यात आलेली तर यंदाची मुलाखत ही बंद खोलीत घेतल्याचं दिसत असून यावरुनच निलेश राणेंनी, “उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात,” असा टोला लगावलाय.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -