घरताज्या घडामोडीराजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

राजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी फुटणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ४० आमदार भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्या चर्चांना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं, असं मोठं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, इतके राजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल याचंही टेन्शन येतं. मला या सगळ्याचे काही संकेत असण्याचा काही भाग नाही. कारण राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

भाजपला अतिरिक्त नेत्यांची गरज आहे का? लोकांची गरज आहे का? या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही. माझ्या पंधरा वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणावर व्यक्तिगत पातळीवर टीका केलेली नाही. भूकंपविरहित पक्षबांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे हे आमच्या हातात नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -