घरमहाराष्ट्रबेसावध राहिल्यानं पराभूत झालो; मुनगंटीवार यांचा पक्षाला घरचा आहेर

बेसावध राहिल्यानं पराभूत झालो; मुनगंटीवार यांचा पक्षाला घरचा आहेर

Subscribe

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बेसावध राहिल्याने पराभूत झालो, अशी प्रतिक्रिया दिली. जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारले या ऐवजी भाजप बेसावध राहिली, असे म्हणणे योग्य ठरेल. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखे आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता, असे म्हणत मुनगंटीवार यांचा पक्षाला घरचा आहेर दिला.

मतदारांनी महाविकास आघाडीला स्वीकारले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या. हे खरे आहे. त्यामुळे त्या जागा गमावणे हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे आणि त्याचे चिंतन केले जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो, त्याचे विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही, ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखे आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता, असे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांना एकही जागा नाही; फडणवीसांचा सेनेला टोला

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या अपयशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांना एकही जागा नाही, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

“विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. विश्लेषण करायचे झाले तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. स्ट्रॅटेजी चूक झाली असेल तर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचे आकलन चुकले. आता आम्हाला कळले त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू. ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक रजिस्ट्रेशन राहिले. आम्ही रजिस्ट्रेशनमध्ये कमी पडलो. माझ्या घरी, गडकरींच्या घरची चार नावे नाहीत. आता ही गोष्ट बाजूला, जे जिंकले त्यांना शुभेच्छा,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी सेनेला टोला लगावला आहे. एक गोष्ट नमूद करावी, ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा सल्ला देखील फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -