घरमहाराष्ट्रकधी तरी 'संजय' बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भातखळकरांचा राऊतांवर निशाणा

कधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भातखळकरांचा राऊतांवर निशाणा

Subscribe

देशातील कोरोना परिस्थितीवरुन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सेनेच्या ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातूनन टीकास्त्र डागलं. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. कधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा, असं आव्हान दिलं आहे..

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “बोथट बोरूची अक्षरे…मुंबईतील दडवलेली रुग्णसंख्या, बीडमधील मृत्यूसंख्या, रुग्णालयांतील अग्निकल्लोळ, डॉक्टरांची कमतरता, महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची नफेखोरी यावरही एकदा बोरू घासा. कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

अयोध्येत फक्त श्रीरामाचा नारा; त्याने राजकीय पक्ष जगतील, मनुष्य नाही – राऊत

शेकडो मृतदेह गंगानदीच्या प्रवाहातून वाहत येत असल्याने तेथील प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं असून आज संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून सध्याच्या एकूण परिस्थितीवर अत्यंत बोचरी टीका केली.

- Advertisement -

‘कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले. गंगेच्या प्रवाहात सोडलेले शंभरावर मृतदेह पाटण्याच्या गंगाकिनारी मिळाले. अयोध्येत पंतप्रधानांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन झाले, पण संपूर्ण अयोध्यानगरीत कोरोनाचा हाहाकार माजला असून अयोध्या ऑक्सिजनअभावी गुदमरत, तडफडत आहे. लोकांना इस्पितळे नाहीत. औषधे नाहीत. लस नाही. प्राणवायू नाही. फक्त श्रीरामाचा नारा आहे. त्याने फार तर राजकीय पक्षांना ऑक्सिजन मिळत राहील. त्या ऑक्सिजनवर यापुढे मनुष्य जगणार नाही. अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार आहे. त्यावर टीका करायची नाही तर काय करायचे?’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -