घरमहाराष्ट्रSummer Special Trains: कोकणवासीयांना डावलत रेल्वेची परप्रातींयासाठी धावाधाव

Summer Special Trains: कोकणवासीयांना डावलत रेल्वेची परप्रातींयासाठी धावाधाव

Subscribe

उन्हाळी विशेष गाड्यांपैकी 80 टक्क्यांहून अधिक गाड्या केवळ उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांसाठी चालवल्या जात आहेत, तर कोकणात जाण्यासाठी केवळ 74 गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचं कन्फर्म तिकीट मिळवताना कोकणात जाणाऱ्यांची मात्र धावपळ होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पुन्हा एकदा चाकरमान्यांना डावलल्याचेच चित्र आहे.

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. मध्य रेल्वेकडून जवळपास 450 हून अधिक विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु, या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी 80 टक्क्यांहून अधिक गाड्या केवळ उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांसाठी चालवल्या जात आहेत, तर कोकणात जाण्यासाठी केवळ 74 गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचं कन्फर्म तिकीट मिळवताना कोकणात जाणाऱ्यांची मात्र धावपळ होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पुन्हा एकदा चाकरमान्यांना डावलल्याचेच चित्र आहे. ( Indian Railway Western and central railway Summer Special Trains Railways run for Other States people not for Konkan  )

पश्चिम रेल्वेनेकडूनही कोकणवासियांसाठी काही विशेष ट्रेन सोडण्यात आल्याचे दिसत नाही.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्या

  • मुंबई सेंट्रल-काठगोडाम -34
  • मुंबई सेंट्रल-कानपूर- 323
  • मुंबई सेंट्रल-ू बनारस- 18
  • वांद्रे- सुभेदारगंज- 18

लाखो कोकणवासी मुंबईत आणि उपनगरात राहतात. मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी या चाकरमान्यांकरत कोकण रेल्वेच्या कमी फेऱ्या ठेवण्यात आल्याने कोकणवासियांची दमछाक होते. त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. परप्रांतियांसाठी अनेक गाड्या सोडल्या जातात.

उत्तर प्रदेश, बिहारसाठी सोडलेल्या गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस- कानपूर- 13, दादर- बलिया -36, ददार- गोरखपूर -48, CSMT-मालदा-10, एलटीटी- बनारस-16, एलटीटी- समस्तीपूर-12, पुणे- कानपूर-12, पनवेल-रेवा-20, पुणे- गोरखपूर-18, एलटीटी-बनारस, दानापूर-68, एलटीटी-सुभेदारगंज -18 चालवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: ग्रामस्थांचा विरोध डावलून रिफायनरीसाठी सर्व्हेक्षण; सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाणला अटक )

मध्य रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने सोडलेल्या विशेष उन्हाळी गाड्या मुंबई ते सभेदारगंजदरम्यान धावणार आहेत.

ट्रेन क्रमांक 04116:
साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 5 मे 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत दर शुक्रवारी रात्री 12.15 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:10 ला सुभेदारगंजला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक: 04115

साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुभेदारगंज येथून 3 मे 2023 मे 28 जून 2023 या कालावधीत दर बुधवारी सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.15 ला एलटीटीला पोहोचेल.

या दोन्ही विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट, धाम, बांदा, रंगौल,भरुसुमेरपूर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -