घरमहाराष्ट्रBJP Politics: राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांसोबत 'या' नेत्याचंही नाव चर्चेत? बैठकीत निर्णय; भाजपामध्ये...

BJP Politics: राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांसोबत ‘या’ नेत्याचंही नाव चर्चेत? बैठकीत निर्णय; भाजपामध्ये धुसफूस

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसे सुचोवातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले की, अशोक चव्हाण हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहे. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. केवळ अशोक चव्हाणच नव्हे तर काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील यांचंही राज्यसभेसाठी नाव चर्चेत आहे. इतर पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांना संधी दिली जाते, परंतु भाजपातील नेत्यांना संधी मिळत नाही असं वाटू लागल्यानं, भाजपात अंतर्गत नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. (BJP Politics Along with Ashok Chavan this leader s name is also in discussion for Rajya Sabha Decisions at the meeting But there is confusion in BJP)

27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला अनेक राजकीय नेते बदलण्याची शक्यता आहे. 15 तारखेला नाव देण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, या सगळ्यात भाजपाकडून दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलेले अकोश चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळेच या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हर्षवर्धन पाटील दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये आले होते. आयात नेत्यांना भाजपामधून राज्यसभेवर पाठवलं जातं आणि पक्षातील नेते तिथेच राहतात, अशी चर्चाही रंगली होती. याबाबत अनेक नेत्यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.

(हेही वाचा: Eknath Khadse : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर नाथाभाऊ म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका)

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -